Mumbai New Vande Bharat News : मुंबईकरांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात. मिळालेल्या माहितीनुसार, राजधानी मुंबईला लवकरच आणखी तीन वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे. सध्या केंद्र शासनाच्या माध्यमातून देशातील वेगवेगळ्या मार्गावर ह्या गाड्या सुरू करण्याचा सपाटा सूरू आहे. पुढील वर्षात लोकसभा तसेच काही राज्यात विधानसभा निवडणुका होणार असल्याने वेगवेगळी विकासाची कामे सुरू आहेत.
याच पार्श्वभूमीवर देशभरातील काही महत्त्वाच्या मार्गावर ह्या वंदे भारत ट्रेन सुरू केल्या जात आहेत. देशात 15 ऑगस्ट 2023 पर्यंत एकूण 75 वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याचा मानस केंद्र शासनाचा असून आगामी काही महिन्यात यापैकी 30 गाड्या सुरू होणार असल्याची माहिती एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्टच्या माध्यमातून हाती आली आहे.
दरम्यान या 30 वंदे भारत गाड्यांमध्ये महाराष्ट्राला एकूण तीन गाड्यांची भेट मिळणार आहे. यामध्ये दोन गाड्या मुंबईहून धावणार आहेत तर एक गाडी पुण्याहून धावणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई ते मडगाव आणि मुंबई ते उदयपूर यादरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे.
याची घोषणा येत्या काही दिवसात भारतीय रेल्वेच्या माध्यमातून केली जाणार आहे. याशिवाय पुणे ते सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे. पुणे ते सिकंदराबाद दरम्यान धावणारी ही गाडी सोलापूर मार्गे धावणार असल्याने सोलापूरला देखील आणखी एका वंदे भारत गाडीचा लाभ मिळेल असे चित्र आहे.
हे पण वाचा :- मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसचा वेग किती? समोर आली धक्कादायक माहिती, पहा….
मुंबई-गोवा वंदे भारत ट्रेन सुरु होणार
मुंबई ते उदयपूर तसेच मुंबई ते मडगाव यादरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू होण्याचे संकेत आहेत. तसेच मुंबई ते गोवा दरम्यानही वंदे भारत गाडी सुरू केली जाणार आहे. मुंबई गोवा बंदे भारत एक्सप्रेस बाबत नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी माहिती दिली होती.
मंत्री महोदय यांनी लवकरच मुंबई ते गोवा दरम्यान वंदे भारत सुरू होणार असल्याचे स्पष्ट केले होते. यामुळे येत्या काही महिन्यात मुंबईला एकूण तीन वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार असल्याचे चित्र आहे.