Mumbai New Expressway : महाराष्ट्रात केल्या काही वर्षांमध्ये विविध रस्ते विकासाची कामे पूर्ण झाली आहेत. महत्त्वाचे म्हणजे अजूनही अनेक महामार्ग प्रकल्पांची कामे सुरू आहेत. अशातच आता मुंबई, नवी मुंबई आणि उपनगरातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. बदलापूर, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर या भागातील नागरिकांना भविष्यात जलद गतीने मुंबई आणि नवी मुंबई कडे जाता येणार आहे.
काल अर्थातच 24 सप्टेंबर 2024 रोजी एमएमआरडीएच्या एका महत्त्वाच्या बैठकीत बदलापूर ते विरार-अलिबाग मल्टीमोडल कॉरीडॉर या प्रवेश नियंत्रित महामार्ग प्रकल्पाच्या प्राथमिक आखणी अहवालास मान्यता दिली आहे.
महत्त्वाचे म्हणजे या प्रकल्पाच्या पुढील कामासाठी देखील गती देण्यात आली आहे. या प्रकल्पाच्या विस्तृत प्रकल्प आराखडा तयार करण्यासाठी सल्लागार नियुक्त करण्यासही कालच्या महत्त्वाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.
त्यामुळे या प्रकल्पाचे काम जलद गतीने पुढे सरकणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की बदलापूर ते नवी मुंबई विमानतळ दरम्यानचा प्रवास वेगवान व्हावा यासाठी बदलापूर ते नवी मुंबई विमानतळ दरम्यान प्रवेश नियंत्रित महामार्ग विकसित केला जाणार आहे.
या मार्गाची लांबी 20 km एवढी राहणार असून यासाठी दहा कोटी हुन अधिक निधी खर्च केला जाणार आहे. जेव्हा हा प्रवेश नियंत्रित महामार्ग सुरू होईल तेव्हा हा प्रवास अवघ्या वीस मिनिटात पूर्ण होणार आहे.
महत्त्वाचे म्हणजे हा प्रकल्प प्रस्तावित विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेला जोडला जाणार आहे. बदलापूर ते विरार मल्टीमोडल कॉरिडॉरसाठी ॲक्सेस-कंट्रोल्ड महामार्ग प्रकल्पात ८ लेन असलेली विभाजित मार्गिका आणि सर्व्हिस रोड विकसित केले जाणार आहेत.
यामुळे मुंबई उपनगर आणि नवी मुंबई मधील नागरिकांचा प्रवास वेगवान होणार आहे. खरं तर मुंबईत आतापर्यंत शेकडो रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. यामुळे शहरातील रस्ते वाहतूक आधीच्या तुलनेत नक्कीच चांगली झाली आहे. मात्र अजूनही या भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या आहे.
दरम्यान हीच समस्या दूर करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थातच एम एम आर डी ए च्या माध्यमातून प्रयत्न केले जात असून याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून हे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबईकरांना नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे.