Mumbai Nerul-Uran Railway Will Start On 15 April : गेल्या काही महिन्यांपासून नेरूळ ते उरण रेल्वे मार्ग प्रकल्पातील दुसरा टप्पा अर्थातच खारकोपर ते उरण रेल्वे मार्ग लवकरच सुरू होईल असे सांगितले जात आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी काही प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मध्ये हा नेरूळ उरण रेल्वे मार्गाचा दुसरा टप्पा अर्थातच खारकोपर ते उरण रेल्वे मार्ग 31 मार्च 2023 रोजी प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल असा दावा केला जात होता.
मात्र आता 31 मार्च उलटून गेली तरीदेखील हा रेल्वे मार्ग सुरू झाला नसल्याने उरणकरांच्या आनंदावर पुन्हा एकदा विरजण पडल आहे. अशा परिस्थितीत उरणकर हा रेल्वे मार्ग प्रकल्प नेमका केव्हा सुरू होईल हा प्रश्न या निमित्ताने पुन्हा एकदा उपस्थित करत आहेत. अशातच एका प्रतिष्ठित मध्ये रिपोर्टच्या माध्यमातून पुन्हा एकदा खारकोपर-उरण रेल्वे मार्गाच्या उद्घाटनाची तारीख समोर आली आहे. सदर मीडिया रिपोर्टवर जर विश्वास ठेवला तर हा रेल्वे मार्ग प्रकल्प 15 एप्रिल 2023 रोजी सुरू केला जाऊ शकतो.
निश्चितच, जर हा रेल्वे मार्ग प्रकल्प 15 एप्रिलला सुरू झाला तर उरणकरांची गेल्या अनेक वर्षांपासूनची इच्छा पूर्ण होणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, नेरूळ ते उरण यापैकी नेरूळ ते खारकोपर पर्यंतचा पहिला टप्पा 2022 मध्येच प्रवाशांच्या सेवेत दाखल झाला आहे. आता या रेल्वे मार्गाचा दुसरा टप्पा खारकोपर ते उरण याचे काम देखील अंतिम टप्प्यात आले आहे.
विशेष म्हणजे उरण पर्यंत लोकलची चाचणी देखील पूर्ण झाली आहे. शिवाय हा रेल्वे मार्ग प्रकल्प वाहतुकीसाठी तयार असल्याचा अहवाल देखील रेल्वे विभागाला सादर करण्यात आला आहे. मात्र या दुसऱ्या टप्प्यातील काही महत्त्वाची कामे अद्याप पूर्ण झालेली नसल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्यातून समोर येत आहे.
हे पण वाचा :- 15 ऑगस्ट पर्यंत 75 वंदे भारत एक्सप्रेस चालवणार मोदी सरकार! महाराष्ट्राला किती?
हाती आलेल्या माहितीनुसार, या मार्गावरील उरण, द्रोणागिरी,न्हावा- शेवा,रांजणपाडा व गव्हाण या रेल्वे स्थानकांची कामे अद्याप अपूर्ण आहेत. यामध्ये उरण,द्रोणागिरी,न्हावा शेवा व रांजणपाडा येथील पार्किंगची तसेच येथील प्रवाशांसाठी प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठीच्या मार्गाची कामे अपूर्ण आहेत. जी की महत्त्वाची कामे असून ही कामे अपूर्ण असताना हा रेल्वे मार्ग सुरू होऊ शकत नाही.
तसेच द्रोणागिरी स्थानकांच्या अंडर ग्राऊंडची कामे अपूर्ण आहेत. मात्र ही सर्व कामे आता अंतिम टप्प्यात आली आहेत. यामुळे लवकरच या रेल्वे मार्गावर आता लोकल धावणार आहे. दरम्यान तीन एप्रिल रोजी म्हणजेच उद्या सोमवारी या मार्गावर पुन्हा एकदा चाचणी करणे प्रस्तावित आहे. ही चाचणी झाल्यानंतर 15 एप्रिल 2023 रोजी अर्थातच शनिवारी या मार्गावर रेल्वे सुरू होईल असा दावा केला जात आहे.