Mumbai Nagpur Train : राजधानी मुंबई ते उपराजधानी नागपूर दरम्यान रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त या विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत. दरवर्षी 14 ऑक्टोबरला धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त उपराजधानी नागपूर येथे असणाऱ्या दीक्षाभूमीला आंबेडकरवादी अनुयायांची मोठी गर्दी होत असते.
दीक्षाभूमीला वर्षभर बौद्ध अनुयायी व पर्यटक भेट देत असतात मात्र अशोक विजयादशमी किंवा १४ ऑक्टोबर रोजी यांच्या संखेत लक्षणिय वाढ होऊन लक्षावधी लोक येथे आलेले असतात.
दरम्यान याच अतिरिक्त गरजेच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून मुंबई ते नागपूर दरम्यान काही विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत. दरम्यान आता आपण या विशेष एक्सप्रेस गाड्यांचे वेळापत्रक थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसं असणार वेळापत्रक ?
एलटीटी नागपूर विशेष एक्सप्रेस ट्रेन (गाडी क्रमांक ०१०१७) ही विशेष गाडी ११ ऑक्टोबरला लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दुपारी २ वाजता रवाना होणार आहे आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजता पोहोचणार आहे.
तसेच गाडी क्रमांक ०१०१८ ही विशेष रेल्वेगाडी १३ ऑक्टोबरला नागपूर येथून रात्री १२.२० वाजता सोडली जाणार आहे आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे त्याच दिवशी सायंकाळी ७ वाजता पोहोचणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ही रेल्वेगाडी ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, चांदूर, धामणगाव, पुलगाव, वर्धा, सिंदी आणि अजनी या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे.
शिवाय गाडी क्रमांक ०१२१८ ही विशेष रेल्वेगाडी नागपूर ते मुंबई दरम्यान चालवली जाणार आहे. ही गाडी १२ ऑक्टोबरला रात्री १०.०५ वाजता नागपूर येथून सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी दुपारी २.३५ वाजता पोहोचेल.
ही रेल्वे सिंदी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मुर्तिजापूर, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण आणि ठाणे येथे थांबा असेल.