Mumbai Metro Station Stop : मुंबईकरांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. खरं पाहता राजधानी मुंबईमध्ये मेट्रोचे जाळे वेगाने पसरत आहे. शहरातील दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड च्या माध्यमातून मेट्रो मार्गाची हाती घेण्यात आलेली कामे जलद गतीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न होत आहेत.
शासनाने देखील कार्पोरेशन ला लवकरात लवकर विविध मार्गावरील मेट्रो प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सूचना दिल्या आहेत. आगामी वर्षात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पाहता शासनाकडून शहरातील दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यासाठी वेगवेगळे प्रकल्प जलद गतीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न होत आहेत.
याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो लवकर चालवण्यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजे एमएमआरसीच्या माध्यमातून कामाला गती देण्यात आली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार हा कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो प्रकल्प डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण केला जाणार आहे.
हे पण वाचा :- पुणे जिल्ह्यात अंगणवाडी सेविकांच्या ‘इतक्या’ रिक्त जागांसाठी भरती सुरू; ऑफलाइन पद्धतीने ‘या’ ठिकाणी अर्ज सादर करण्याचे आवाहन
याबाबत एमएमआरसीने दिलेल्या माहितीनुसार, या मार्गावरील 26 रेल्वे स्टेशनचे काम जवळपास 90 टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरित रेल्वे स्टेशनचे काम देखील जलद गतीने होत आहे. कुलाबा-वांद्रे-सीप्झ हा मेट्रो मार्ग 33.5 किलोमीटर लांबीचा आहे. या मार्गावर ट्रॅक बसवण्याचे काम हे 2021 पासून सुरू आहे. हे काम जवळपास 56 % पूर्ण झाले असून उर्वरित काम या वर्षाच्या अखेरपर्यंत होणार आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, आरे मधील कारशेड लवकरात लवकर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे पण कारशेडचं काम आत्तापर्यंत 53.8 टक्के इतकंच पूर्ण झालं आहे. म्हणजे या वर्षात कारशेडचं काम पूर्ण होणार नाही म्हणून एमएमआरसीने सीप्झ ते बीकेसीपर्यंत 9 रेकसह मेट्रो सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली आहे.
एकंदरीत मेट्रो तीन चा पहिला टप्पा डिसेंबर 2023 पर्यंत सुरू केला जाणार आहे. या आधी या मार्गावर चाचण्या होणार आहेत. तसेच जुलै 2024 पर्यंत दुसऱ्या टप्प्यामधील चाचण्या पूर्ण होतील. एकंदरीत मुंबई मेट्रो तीनचा पहिला टप्पा डिसेंबर 2023 मध्ये सुरू होईल अशी शक्यता आहे.
हे पण वाचा :- Cotton News : एप्रिल महिन्यात कापूस दर वाढीची शक्यता; किती वाढणार भाव? पहा कृषी क्षेत्रातील जाणकारांचे मत
कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो मार्गावर ही राहतील रेल्वे स्थानके
- कफ परेड
- विधानभवन
- चर्चगेट
- हुतात्मा चौक
- सीएसएमटी
- कालबादेवी
- गिरगाव
- ग्रँट रोड
- मुंबई सेंट्रल
- महालक्ष्मी
- सायन्स म्युझियम
- आचार्य अत्रे चौक
- वरळी
- सिद्धिविनायक
- दादर
- शितलादेवी
- धारावी
- बीकेसी
- विद्यानगरी
- सांताक्रुझ
- सीएसएमआयए (टी १)
- सहार रोड
- सीएसएमआय (टी २)
- मरोळ नाका
- एमआईडीसी
- सीप्झ
हे पण वाचा :- मोठी बातमी ! देशातील ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार 4 हजार रुपये; कोणाला मिळणार लाभ? वाचा सविस्तर