Mumbai Metro Railway Project : मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी. मुंबई हे कॅपिटल शहर तर आहेच शिवाय हे एक प्रमुख औद्योगिक शहर देखील आहे. यामुळे या शहरात रोजाना लोकसंख्या वाढत आहे. कामानिमित्त मुंबई शहरात रोजाना हजारो लोक मुंबईमध्ये स्थलांतर करत आहेत. महाराष्ट्रातून तर मोठ्या प्रमाणात नागरिक स्वप्ननगरी मुंबईमध्ये येतच आहेत शिवाय या मायानगरीत परराज्यातून येणाऱ्या लोकांची संख्या देखील विशेष लक्षणीय आहे.
साहजिक यामुळे मुंबई शहराचा विकास झपाट्याने होत आहे. मुंबई हे वेगाने प्रगती करणारे शहर असून या शहराची नोंद जगातील प्रमुख शहरांमध्ये होते. निश्चितच ही महाराष्ट्रवासी म्हणून आपल्यासाठी अभिमानाची बाब असली तरी देखील मुंबईमधील वाहतूक कोंडी मुंबईकरांसाठी जीवघेणी सिद्ध होत आहे. वाढती लोकसंख्या, वाढती वाहनांची संख्या आणि औद्योगिकीकरणने घेतलेला वेग या सर्व पार्श्वभूमीवर ट्रॅफिकची समस्या दिवसेंदिवस शहरात आणि उपनगरात वाढत आहे.
हे पण वाचा :- कापूस दरात पुन्हा घसरण! दरवाढीची शक्यता अजूनही कायम आहे का? कापूस 9 हजार पार जाणार का? पहा काय आहे बाजारातील चित्र
अशा परिस्थितीत शहरांमधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून तसेच शासनाच्या माध्यमातून वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत. यामध्ये खाजगी वाहनांचा वापर कमी करून सार्वजनिक वाहतूक अधिका-अधिक लोकांनी वापरावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याच प्रयत्नांचा भाग म्हणून लोकांना सार्वजनिक वाहतुकीच्या वापराला प्रेरित करण्यासाठी टॉपक्लास सार्वजनिक वाहतूक व्यवस्था प्रवाशांना उपलब्ध करून दिली जात आहे.
यामध्ये डबल डेकर सिटी बस, एसी बसेस तसेच प्रवाशांच्या सोयीसाठी मेट्रो देखील सुरू केल्या जात आहेत. एसी लोकल देखील शहरात आणि उपनगरात धावत आहेत. कुलाबा-बीकेसी-सीप्झ हा मेट्रो मार्ग देखील प्रस्तावित आहे. दरम्यान हा संपूर्ण मेट्रो मार्ग भुयारी मेट्रो मार्ग असून हा मुंबई मधला पहिलाच भुयारी मेट्रो मार्ग राहणार आहे. या मेट्रो मार्ग प्रकल्पाचा आरे ते बीकेसी हा टप्पा डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण करण्याचा मानस सरकारचा आहे.
हे पण वाचा :- मोठी बातमी ! ‘या’ 31 मार्गांवर सुरु होणार वंदे भारत एक्सप्रेस; मुंबई, पुणे शहरालाही मिळणार नवीन वंदे भारत ट्रेनची भेट
शिवाय जून 2024 पर्यंत हा संपूर्ण मेट्रोमार्ग प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल असा आशावाद व्यक्त होत आहे. दरम्यान आता या मेट्रो मार्ग प्रकल्पाच्या कामाची गती पाहता हा प्रकल्प ठरवून देण्यात आलेल्या वेळेपूर्वी होणार असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे निश्चितच ही मुंबईकरांसाठी एक दिलासा देणारी बाब राहणार आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी दिलेल्या माहितीनुसार हा प्रकल्प वरळीपर्यंत वेळेआधीच पूर्ण होणार आहे.
कॉर्पोरेशनच्या संबंधित लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण प्रकल्प सुरू करण्यासाठी जून 2024 ची वाट न पाहता वरळीपर्यंत हा भुयारी मेट्रो मार्ग सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. यामुळे या प्रकल्पाचा काही भाग येत्या काही दिवसात प्रत्यक्षात कार्यान्वित होईल आणि यामुळे प्रवाशांना दिलासा मिळेल असा आशावाद या निमित्ताने व्यक्त होत आहे.