Mumbai Metro Railway News : मुंबई शहरात आणि उपनगरात मेट्रोचे जाळे विकसित केले जात आहे. शहरात आणि उपनगरात मेट्रोचे तब्बल 14 मार्ग तयार करण्याचे नियोजन आहे. या पैकी तीन मार्ग शहरातील आणि उपनगरातील नागरिकांसाठी याआधीच सुरू करण्यात आले आहेत. तर सात मेट्रो मार्गांचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.
या मार्गिका देखील लवकरात लवकर शहरातील नागरिकांसाठी खुल्या केल्या जाणार आहेत. अशातच मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातील नागरिकांसाठी एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे अपडेट समोर आले आहे. हे अपडेट आहे मेट्रो 7 अ बाबत. खरंतर, शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी आणि नागरिकांना वाहतूक कोंडीतून दिलासा देण्यासाठी विविध मार्गांवरील मेट्रोचे काम हाती घेतले जात आहे.
शहरातील नागरिकांना जलद गतीने प्रवास करता यावा, खाजगी वाहनांचा कमी वापर व्हावा, प्रदूषणाचा स्तर कमी व्हावा या पार्श्वभूमीवर मेट्रोचे जाळे विकसित केले जात आहे. यामध्ये मेट्रो सात अ या प्रकल्पाचा देखील समावेश आहे. या प्रकल्प अंतर्गत अंधेरी पूर्व येथील गुंदवली ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल दोन दरम्यान मेट्रो मार्ग विकसित केला जात आहे.
आता या मेट्रो मार्गाचे काल अर्थातच दोन सप्टेंबर 2023 पासून प्रत्यक्ष काम सुरू झाले आहे. विशेष म्हणजे काम सुरू झाल्यानंतर मात्र सात महिन्यात हा मेट्रो मार्ग प्रवासासाठी खुला करण्याचे टार्गेट एम एम आर डी ए ने ठेवले आहे. हा मेट्रोमार्ग एकूण तीन किलोमीटर लांबीचा असून यापैकी अडीच किलोमीटर लांबीचा मार्ग भूमिगत राहणार आहे. भूमिगत मार्गासाठी बोगद्याचे काम काल सुरू झाले आहे.
विमानतळाच्या टर्मिनल दोन पुढे हे काम सुरू झाले आहे. आता याचे काम येत्या सात महिन्यात म्हणजेच मे 2024 पर्यंत पूर्ण करण्याचे एम एम आर डी ए ने जाहीर केले आहे. या मार्गांवर विमानतळ, विमानतळ वसाहत (अंधेरी) व अंधेरी पूर्व (गुंदवली) ही तीन महत्त्वाची स्थानके राहणार आहेत. यामुळे अंधेरी पूर्व मधून मुंबई विमानतळाकडे जाणाऱ्या नागरिकांचा प्रवास गतिमान होण्यास मदत मिळणार आहे.