Mumbai Metro Pass : राजधानी मुंबई आणि उपनगरात रेल्वेचे जाळे विस्तारण्यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत. यासोबतच मेट्रो देखील वेगवेगळ्या मार्गावर सुरू करण्याचे नियोजन आहे. काही मार्गावर मुंबईमध्ये मेट्रो सुरू देखील झाल्या आहेत.
दरम्यान आता मेट्रो ने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना आणि चाकरमान्यांना तसेच मुंबईला भेट देणाऱ्या पर्यटकांना मेट्रो ने प्रवास करणे स्वस्त व्हावे या दृष्टीने एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. महा मुंबई मेट्रो कडून आता मेट्रोचा प्रवास स्वस्त करण्यात आला आहे. मुंबई मेट्रो मार्ग 2A आणि 7 या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता महा मुंबई मेट्रो कडून पासची सवलत देण्यात आली आहे.
हे पण वाचा :- पुणे, सोलापूर वासियांसाठी महत्त्वाची बातमी; पुणे-सिकंदराबाद वंदे भारत ट्रेन केव्हा सुरु होणार? पहा
निश्चितच यामुळे मेट्रोचा प्रवास स्वस्त होणार असून मेट्रोची लोकप्रियता वाढणार आहे. यामुळे आक्रमण यांचा दैनंदिन प्रवास आणि पर्यटकांचा मुंबईमधला प्रवास जलद गतीने आणि स्वस्तात होणार आहे. यामुळे कमी तिकीट दरात प्रवाशांना आरामदायी प्रवासाचा लाभ घेता येणार आहे.
याबाबत महामुंबई मेट्रोचे अध्यक्ष एस व्ही आर श्रीनिवासन यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता महा मुंबई मेट्रो कडून विशेष मासिक आणि दैनिक पास सुरू केले जाणार आहेत. विशेष म्हणजे जे प्रवासी मुंबई 1 हे कार्ड सध्या स्थितीला वापरत आहे त्यांना देखील याची सवलत मिळणार आहे.
हे पण वाचा :- एसटी महामंडळात मेगा भरती ! फक्त 10वी पास उमेदवार करू शकतात अर्ज, वाचा सविस्तर
यानुसार आता एका महिन्याच्या कालावधीत म्हणजेच 30 दिवसांच्या कालावधीत साठ वेळा मेट्रो ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना 20 टक्के सवलत मिळणार आहे. तसेच 45 वेळा मेट्रो ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना 15 टक्के सवलत मिळेल. याचे शुल्क हे मुंबई एक या कार्डाच्या माध्यमातून आकारल जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
यासोबतच पर्यटकांसाठी दैनंदिन पासची व्यवस्था करून देण्यात आली आहे. यानुसार एक दिवसीय पासचे शुल्क 80 रुपये राहिल आणि तीन दिवसीय पास शुल्क दोनशे रुपये राहणार आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे मुंबई एक कार्डच्या माध्यमातून सोमवार ते शनिवार पाच टक्के सूट आहे आणि रविवारी दहा टक्के सूट देण्यात आली आहे.
मुंबई एक कार्ड कोठे मिळणार?
ज्या प्रवाशांना मुंबईमध्ये मेट्रो ने प्रवास करायचा आहे अशा प्रवाशांना मुंबई एक कार्डचा मोठा बेनिफिट होत आहे. प्रवाशांना हे कार्ड जर आवश्यक असेल तर प्रवासी मुंबई मेट्रोच्या तिकीट काउंटर आणि कस्टमर केअर काउंटरवरून हे कार्ड मिळू शकतात. या कार्डला त्या ठिकाणी रिचार्ज देखील करून मिळतो. हे एक नॅशनल मोबिलिटी कार्ड असून याचा प्रवासाव्यतिरिक्त रिटेल स्टोअर मध्ये देखील वापर केला जाणार आहे आणि बेस्ट बसच्या प्रवासामध्ये देखील याचा उपयोग होणार आहे.
निश्चितच मुंबई मेट्रो ने सुरू केलेली ही योजना मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अति महत्त्वाची असून यामुळे प्रवाशांचा प्रवास जलद गतीने होईल आणि त्यांच्या पैशांची देखील बचत होईल असा आशावाद या निमित्ताने व्यक्त होत आहे.
हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! त्या सात मेट्रो मार्गीकेसाठी 166 कोटींचे बिनव्याजी कर्ज, मेट्रोच्या कामाला मिळणार गती