Mumbai Metro News : राजधानी मुंबईत सध्या दळणवळण व्यवस्था सुधारित करण्यासाठी शासन, प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. विशेषता लोहमार्ग मजबूत करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न शासनाच्या माध्यमातून होत आहेत. खरं पाहता, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजधानी मुंबईमध्ये विकासाची कामे जलद गतीने पूर्ण करण्यासाठी शासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबई मेट्रोचा विस्तार केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आता मुंबई मेट्रोचा विस्तार हा उल्हासनगर पर्यंत होणार आहे. त्यामुळे निश्चितच उल्हासनगर कडील प्रवास आता सोयीचा होईल. एम एम आर डी ए मुंबई मेट्रोपोलीटन रिजन डेव्हलपमेंट ऑथॉरिटी अर्थातच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्या माध्यमातून ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो 5 मार्गाचा विस्तार उल्हासनगर पर्यंत केला जाणार आहे.
हे पण वाचा :- म्हाडा कोकण मंडळाची 4,654 घरांची सोडत; ‘या’ दिवशी सुरु होणार अर्ज विक्री-स्वीकृतीस सुरवात, बघा संपूर्ण टाइमटेबल एका क्लिकवर
मिळालेल्या माहितीनुसार या मेट्रो मार्गाचा विस्तार हा खडकपाडा मार्गे होणार आहे. म्हणजे आता ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो ही कल्याण ते खडकपाडा आणि खडकपाडा ते उल्हासनगर अशी धावणार आहे. या मार्गाचे एकूण अंतर जवळपास आठ किलोमीटरच्या आसपास राहील असा अंदाज आहे. तसेच या मार्गाचे काम एकूण दोन टप्प्यात होणार आहे.
या मेट्रो मार्ग प्रकल्पाचा आता आराखडा देखील तयार होईल आणि यासाठी सल्लागाराची नियुक्ती येत्या काही दिवसात केली जाईल अशी माहिती एका मीडिया रिपोर्टच्या माध्यमातून हाती येत आहे. सल्लागार नियुक्तीचा प्रस्ताव पुढील एमएमआरडीए बैठकीत मांडला जाण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. निश्चितच मेट्रोचा उल्हासनगर पर्यंत विस्तार करण्यासाठी एमएमआरडीएने कंबर कसली आहे यातील मात्र देखील शंका नाही.
हे पण वाचा :- मुंबई ते गोवा वंदे भारत एक्सप्रेसबाबत मोठी अपडेट ! ‘या’ मार्गांवर धावणार ट्रेन; ‘हे’ असतील थांबे, पहा डिटेल्स
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सध्या मुंबई मेट्रो 5 प्रकल्पचे काम म्हणजे ठाणे भिवंडी कल्याणच काम सुरू आहे. हा प्रकल्प एकूण 25 किलोमीटर लांबीचा आहे. या प्रकल्पाची किंमत ही एकूण 8416 कोटी रुपये आहे. या प्रकल्पाचे काम एकूण दोन टप्प्यात केलं जात आहे. ठाणे ते भिवंडी आणि भिवंडी ते कल्याण असे काम सुरू आहे. यात पहिल्या टप्प्याचे काम फेब्रुवारी पर्यंत जवळपास 70% पूर्ण झालं आहे. विशेष म्हणजे दुसऱ्या टप्प्याचे काम येत्या काही दिवसात सुरू होणार आहे. अशातच आता या मेट्रो मार्ग प्रकल्पाचा विस्तार उल्हासनगर पर्यंत केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
विशेष बाब म्हणजे महानगर आयुक्त एस व्ही श्रीनिवासन यांनी देखील दुजोरा दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या आदेशानुसार हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे. म्हणजेच आता मेट्रो ने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते उल्हासनगर प्रवास येत्या काही दिवसात शक्य होईल असा आशावाद व्यक्त होत आहे. निश्चितच यामुळे मुंबई आणि महानगरातील मेट्रो वाहतूक गतिमान होणार असून नागरिकांचा मोठा वेळ वाचणार आहे. निश्चितच मुंबईकरांसाठी मेट्रोचा हा विस्तार अच्छे दिन आणणारा राहणार आहे.
हे पण वाचा :- Shirdi News : काय सांगता….! मुंबई-सोलापूर अन मुंबई-साईनगर शिर्डी वंदे भारत ट्रेन बंद होणार का?