Mumbai Metro News : मुंबई, नवी मुंबई तसेच उपनगरात मेट्रोचा विस्तार करण्याचे काम सध्या जोमात सुरू आहे. खरं पाहता कोणत्याही शहराच्या विकासात तेथील दळणवळण व्यवस्था अति महत्त्वाची भूमिका निभावत असते. जर शहरातील दळणवळण व्यवस्था मग ती लोहमार्गाची असो किंवा रस्ते मार्गाची ती मजबूत असेल तर त्या शहराचा विकास जलद गतीने होण्यास मदत होत असते.
हेच कारण आहे की शासनाच्या आणि प्रशासनाच्या माध्यमातून मुंबई शहर आणि उपनगरातील दळणवळण व्यवस्था अजूनच मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान आता नवी मुंबई वासियांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. हाती आलेल्या माहितीनुसार नवी मुंबई शहरातील जनतेला लवकरच मेट्रोचा लाभ मिळणार आहे. पेंधर ते बेलापूर या मार्गावर आता लवकरच मेट्रो धावणार आहे.
हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी; वर्सोवा विरार सीलिंक आता ‘या’ शहरापर्यंत वाढवला जाणार, पहा संपूर्ण डिटेल्स
या मार्गावर मेट्रो सुरु करण्यासाठी आवश्यक सर्व चाचण्या पूर्ण झाल्या असून एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत या मार्गावर मेट्रो धावेल अशी माहिती सिडकोच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एका प्रतिष्ठित वृत्तसंस्थेला दिली आहे. खरं पाहता गेल्या अनेक वर्षांपासून या मेट्रो मार्ग प्रकल्पाचे काम सुरू आहे. मात्र वेगवेगळ्या तांत्रिक अडचणींमुळे या मार्गाचे काम जलद गतीने होऊ शकले नाही.
परंतु आता या मार्गाचे काम पूर्ण झाले असून या मार्गाच्या उद्घाटनासाठी मुहूर्त सापडत नसल्याचे चित्र आहे. पण सिडकोच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या महिन्याअखेर हा मेट्रो मार्ग सुरू होईल असा आशावाद व्यक्त केला असल्याने आता नवी मुंबई वासियाची गेल्या अनेक वर्षांपासून ची मेट्रोची इच्छा पूर्ण होणार असल्याचे सांगितले जात आहे.
कसा आहे या मेट्रो मार्गाचा सविस्तर रूट मॅप
आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, नवी मुंबई मेट्रोचा पहिला टप्पा हा बेलापूर ते पेंधार असा आहे. आता या 11 किमीच्या मेट्रो मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. या मेट्रोमार्गांवर 11 स्थानके राहणार आहेत. तसेच तळोजा या ठिकाणी कार डेपो विकसित झाला आहे. दरम्यान या मार्गावर किती तिकीट आकारले जाईल याबाबत देखील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून दोन किलोमीटरसाठी दहा रुपये, दोन ते चार किलोमीटरसाठी पंधरा रुपये, चार ते सहा किलोमीटर साठी 20 रुपये, सहा ते आठ किलोमीटर साठी 25 रुपये, आठ ते दहा किलोमीटर साठी 30 रुपये आणि दहा किलोमीटर साठी अधिकचे 40 रुपये भाडे द्यावे लागणार आहे. निश्चितच येत्या काही दिवसात नवी मुंबईकरांना मेट्रोचा लाभ मिळणार असून यामुळे प्रवास जलद गतीने आणि आरामदायी होईल असा आशावाद व्यक्त होत आहे.
हे पण वाचा :- वंदे भारत एक्सप्रेसबाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय; 12 एप्रिलला ‘या’ रूटवर सुरु होणार आणखी एक Vande Bharat Train, पहा…..