Mumbai Metro Breaking News : मुंबईत सध्या मेट्रो मार्गाच्या कामांनी मोठी गती पकडली आहे. नवी मुंबईत देखील वेगवेगळी मेट्रो मार्ग प्रकल्पांची कामे सुरू आहेत. मुंबई मेट्रो रेलच्या माध्यमातून संपूर्ण मुंबई आणि उपनगरात मेट्रो मार्गाचे जाळे विणण्याचे काम सुरू आहे. शहरातील आणि उपनगरातील प्रमुख मार्गावर मेट्रो सुरु करण्याचे नियोजन मुंबई मेट्रोरेलचे आहे.
दरम्यान आता मुंबईमधील अति महत्त्वाच्या अशा मेट्रो मार्ग प्रकल्पाबाबत एक मोठी माहिती हाती आली आहे. कुलाबा-वांद्रे-सीप्झ या अति महत्त्वाच्या मेट्रो मार्ग प्रकल्पाबाबत माहिती हाती आली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, या प्रकल्पाचे आत्तापर्यंत 80 टक्के काम पूर्ण झाले असल्याचा दावा मुंबई मेट्रो रेल्वेने केला आहे.
हे पण वाचा :- मुंबईकरांनो इकडे लक्ष द्या ! ‘हा’ पूल 11 एप्रिलपासून ‘इतके’ दिवस राहणार बंद, प्रवाशांची होणार गैरसोय
दरम्यान उर्वरित काम युद्धपातळीवर सुरू असून लवकरच हा प्रकल्प मार्गी लावण्याच नियोजन आहे. या प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या आरे ते बीकेसी या पहिल्या टप्प्याचे जवळपास 86 टक्के काम पूर्ण झाली असल्याची माहिती प्राधिकरणाने दिली आहे. तसेच बीकेसी ते कप परेड या दुसऱ्या टप्प्याचे काम जवळपास 76% पूर्ण झाली असल्याची माहिती प्राधिकरणाने एका मीडिया रिपोर्टला दिली आहे.
संपूर्ण मेट्रोमार्ग प्रकल्पाचा विचार केला तर या प्रकल्पाचे जवळपास 80 टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित 20% काम युद्ध पातळीवर सुरू असल्याचा दावा मुंबई मेट्रो रेल प्राधिकरणाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. खरं पाहता, या मेट्रो मार्ग प्रकल्पाला आरे कार शेड मुळे मध्यंतरी ब्रेक लागला होता.
हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी खुशखबर ! आता पुण्याचा प्रवास होणार सुसाट; ‘या’ अति महत्त्वाच्या प्रकल्पाला एमएमआरडीएची मंजुरी, पहा….
परंतु नवोदित शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर या कामाला गती मिळाली असून आता डिसेंबर 2024 पर्यंत मेट्रो मार्ग पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान हा प्रकल्प मध्यंतरी रखडला त्यामुळे प्रकल्पाचा खर्च तब्बल दहा हजार कोटी रुपयांनी वाढला असल्याच उघड झाले आहे.
हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर जवळपास 33.5 किलोमीटर लांबीचा मुंबईतला पहिला-वहिला भूमिगत मेट्रो मार्ग प्रकल्प राहणार आहे. या प्रकल्पा अंतर्गत प्रत्येकी 5.2 मीटर व्यासाचे जुळे बोगदे तयार करण्यात आले आहेत. हे बोगदे जमिनीपासून वीस ते पंचवीस मीटर खोल आहेत. या बोगद्यामधून मेट्रो धावणार असून हा मार्ग आता डिसेंबर 2024 पर्यंत प्रवाशांसाठी खुला केला जाणार आहे.