Mumbai Local Train News : मुंबई शहरात आणि उपनगरात प्रवास करण्यासाठी लोकल ट्रेन चा सर्वाधिक वापर केला जातो. मुंबईच्या लोकलला मुंबईची लाईफ लाईन म्हणून ओळखले जाते. दरम्यान आता या लोकल ट्रेनबाबत एक मोठी अपडेट हाती आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आता बोरिवली ते विरार दरम्यान लोकलचा प्रवास गतिमान होण्यास मदत होणार आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, बोरिवली ते दहिसर दरम्यान लोकलचा वेग कमालीचा मंदावतो. क्रॉस ओव्हर असल्याने या ठिकाणी वेग कमी होतो. मात्र बोरिवली ते दहिसर स्थानक यादरम्यान रेल्वेरूळ आणि पॉइंटसंबंधी तांत्रिक कामे हाती घेण्यात आली होती.
हे पण वाचा :- पुणेकरांना वंदे भारत एक्सप्रेसनंतर आणखी एक मोठी भेट ! ‘या’ दिवशी धावणार भारत गौरव ट्रेन, ट्रेनचा रूट कसा असणार वाचा इथं
बोरिवली ते दहिसर दरम्यानचा लोकल प्रवास गतिमान करण्यासाठी ही तांत्रिक कामे हाती घेण्यात आली होती. आता ही महत्वाची कामे पूर्ण झाली असून बोरिवली ते दहिसर अन विरार असा लोकलचा प्रवास गतिमान होणार आहे.
बोरिवली फलाट क्रमांक आठवरून डाउन जलद मार्गावरून विरारच्या दिशेने पॉईंट मध्ये बदल करण्यात आले आहेत. तसेच अप जलद दिशेनेही पॉइंटमध्ये बदल करण्यात आले आहेत. या तांत्रिक कामांमुळे आतापर्यंत लोकल १५ किमी प्रतितास अशी धावत होती.
हे पण वाचा :- मुंबई ते नवी मुंबईला जोडणारा ‘हा’ महत्त्वाचा प्रकल्प अडचणीत; न्यायालयाने दिलेत ‘हे’ महत्त्वाचे आदेश, वाचा सविस्तर
पण आता काम पूर्ण झाले आहे म्हणून बोरिवली ते दहिसरदरम्यान ३० किमी प्रतितास या वेगाने लोकल धावणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे. आता बोरिवलीतील अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल फेऱ्यांचा वेग आधीच्या तुलनेत वाढणार असल्याचे मत व्यक्त होत आहे.
साहजिकच यामुळे लोकलचा प्रवास गतिमान होणार आहे. बोरिवली ते विरार दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता जलद गतीने लोकलचा प्रवास करता येणे शक्य होणार आहे. यामुळे प्रवाशांचा बहुमूल्य असा वेळ वाचणार आहे. निश्चितच रेल्वेने केलेली ही तांत्रिक कामे रेल्वे प्रवाशांसाठी फायदेशीर राहणार आहेत.
हे पण वाचा :- राज्य शासनाचा मोठा निर्णय; शेतकऱ्यांना आता ‘या’ बाबीसाठी मिळणार 2 लाखाचं अनुदान ! वाचा सविस्तर