Mumbai Local Train Breaking News : मुंबई शहरात आणि उपनगरात कामानिमित्त येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच कामानिमित्त मुंबईमध्ये दूरवरील उपनगरातून देखील मोठ्या प्रमाणात नागरिक कामानिमित्त येत असतात. या अशा चाकरमान्यांसाठी, कामगारांसाठी मुंबईची लोकल जणू काही लाईफ लाईन असतील तर झाली आहे.
यामुळेच मुंबई लोकलला मुंबईची जीवन वाहिनी म्हणून आता संबोधलं जातं. या लोकल ट्रेनमुळे मुंबईत मधील प्रवास अधिक गतिमान आणि जलद झाला आहे. मात्र लोकल मधील वाढती गर्दी आणि या गर्दीमुळे काहीवेळेला होणारे अपघात ही एक चिंताजनक बाब आहे. परंतु स्वस्त, जलद प्रवास यामुळे लोकलच्या प्रवासाला सर्वाधिक पसंती दर्शवली जाते.
हे पण वाचा :- वावर है तो पावर है ! सोलापूरच्या प्रयोगशील शेतकऱ्यांनी लिंबूच्या शेतीतून मिळवले एकरी 10 लाखांचे उत्पन्न, वाचा ही यशोगाथा
इतर मार्गाने प्रवास करण्यापेक्षा म्हणजे सिटी बस किंवा प्रायव्हेट वाहनने प्रवास करण्यापेक्षा प्रवासी लोकलनेच प्रवास करण्यास अधिक पसंती या ठिकाणी दर्शवत असतात. दरम्यान लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी एक मोठी माहिती हाती आली आहे. खरं पाहता मध्य रेल्वेच्या काही लोकल फेऱ्या आगामी दोन दिवस कामानिमित्त बंद राहणार आहेत.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की काही आवश्यक कामानिमित्त मध्य रेल्वेच्या माध्यमातून कर्जत ते खोपोली घाट यादरम्यान लोकलच्या फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. लोकल फेऱ्या या 12 ते 14 एप्रिल पर्यंत बंद राहणार आहेत. म्हणजेच पुढील दोन दिवस या मार्गावर लोकल धावणार नाही. कर्जत ते खोपोली गाडी दरम्यान मध्य रेल्वेने मेगाब्लॉक ची घोषणा केली आहे.
निश्चितच येथील प्रवाशांसाठी हा मोठा फटका राहणार आहे. मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार 12 एप्रिल 2023 ते 14 एप्रिल 2023 सकाळी दहा वाजून पन्नास मिनिटांनी ते दुपारी तीन वाजून 45 मिनिटांपर्यंत हा ब्लॉक राहणार आहे. आता या ब्लॉकमुळे उद्यापर्यंत दुपारी 1.15 मिनिटांनी निघणारी कर्जत- खोपोली आणि त्यामागोमाग 2.55 वाजता निघणारी खोपोली- कर्जत लोकल रद्द करण्यात आली आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की सीएसएमटी ते खोपोली या दरम्यान धावणारी लोकल केवळ कर्जत पर्यंत येणार आहे. ही ट्रेन आपल्या नियोजित वेळेत सीएसएमटी येथून सुटेल मात्र ती थेट खोपोली या ठिकाणी न जाता कर्जत पर्यंत जाणार आहे. तसेच खोपोली ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ही ट्रेन देखील खोपोली वरून न सुटता कर्जतवरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कडे रवाना होईल याची नोंद प्रवाशांनी या ठिकाणी घ्यायची आहे.
एकंदरीत या ब्लॉकमुळे थोड्याफार प्रमाणात प्रवाशांना फटका बसण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वेने घेतलेल्या या ब्लॉकच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना आता आपल्या प्रवासाचे नियोजन या ठिकाणी आखावे लागणार आहे.
हे पण वाचा : मुंबईकरांनो इकडे लक्ष द्या ! ‘हा’ पूल 11 एप्रिलपासून ‘इतके’ दिवस राहणार बंद, प्रवाशांची होणार गैरसोय