Mumbai Local Railway : देशाच्या आर्थिक राजधानीतील नागरिकांसाठी अर्थातच मुंबईकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे. ही नवीन अपडेट आहे मुंबईची लाईफ लाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकलबाबत. खरंतर, लोकलने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी ही महत्त्वाची बातमी राहणार आहे.
कारण की मध्य रेल्वेने तब्बल तीन आठवड्यांसाठी काही लोकल गाड्या रद्द केल्या आहेत. यामुळे काही प्रवाशांना याचा मनस्ताप सहन करावा लागणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार सेंट्रल रेल्वेने डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर याच्या कामासाठी पनवेल यार्डात तब्बल 22 दिवसांचा ब्लॉक घोषित केला आहे. आज सोमवार दिनांक 11 सप्टेंबर 2023 ते 2 ऑक्टोबर 2023 दरम्यान हा ब्लॉक राहणार आहे.
जस की आपणास ठाऊकच आहे की मुंबईतील सुप्रसिद्ध जवाहरलाल नेहरू बंदर अर्थातच जेएनपीटी ते ग्रेटर नोवेडातील दादरीपर्यंत समर्पित मार्गिका उभारण्याचे काम सुरू आहे. दरम्यान हा ब्लॉक याच प्रकल्पाचा एक भाग पूर्ण करण्यासाठी घेण्यात आला आहे. पनवेल स्टेशन यार्डमध्ये याच प्रकल्पांतर्गत दोन मार्गीका उभारल्या जात आहेत.
यासाठी मात्र लोकल पार्किंग मार्गीका मध्ये बदल केला जाणार आहे. याच कामासाठी आजपासून ते दोन ऑक्टोबर पर्यंत रात्री साडेबारा ते सकाळी साडेपाच वाजेपर्यंत ब्लॉक घेतला जाणार आहे. दरम्यान ब्लॉक कालावधीमध्ये काही गाड्या अंशता रद्द करण्यात आल्या आहेत तर काही गाड्या पूर्णतः रद्द करण्यात आल्या आहेत.
रात्री उशिरा धावणाऱ्या लोकल फेऱ्या आणि सकाळी पहाटे धावणाऱ्या लोकल फेऱ्या या ब्लॉक मुळे रद्द राहणार आहेत. अशा परिस्थितीत आज आपण या ब्लॉक कालावधीमध्ये कोणत्या लोकल गाड्या रद्द राहतील हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
या कालावधीमध्ये सीएसएमटी ते पनवेल रात्री ११.१४, १२.२४, सकाळी ५.१८, ६.४० ला धावणारी लोकल रद्द राहणार आहे.
कोणत्या गाड्यां रद्द राहणार
पनवेल ते सीएसएमटी दरम्यान धावणारी रात्री ९.५२, १०.५८, पहाटे ४.०३, ५.३१ ची लोकल रद्द करण्यात आली आहे.
ठाणे-पनवेल-नेरुळ दरम्यान धावणारी रात्री ९.३६, १२.०५, पहाटे ५.१२, ५.४० वाजेची लोकल रद्द राहणार आहे.
पनवेल-ठाणे दरम्यान धावणारी रात्री ११.१८, पहाटे ४.३३, ४.५३ ची लोकल फेरी या ब्लॉकमुळे रद्द राहणार आहे.
कोणत्या गाड्या अंशता रद्द राहणार
या कालावधीत रात्री ११.३०, ११.५२, १२,१३,१२.४० ला धावणारी सीएसएमटी-पनवेल लोकल बेलापूरपर्यंत धावणार आहे. म्हणजे ही गाडी थेट पनवेलला जाणार नाही. फक्त बेलापूरपर्यंत धावेल आणि बेलापूरवरूनच सीएसएमटीकडे रवाना होणार आहे.
तसेच या कालावधीत रात्री १२.५० ला धावणारी वडाळा-बेलापूर लोकल वाशीपर्यंत धावणार आहे.