Mumbai Local Railway News : मुंबईमध्ये दैनंदिन कामासाठी जाणारे लाखो लोक लोकलने प्रवास करत असतात. लाखो मुंबईकरांसाठी लोकल ही सेकंड होम ठरते. दररोज लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या लाखोंच्या घरात आहे.
तथापि कामाच्या दिवसात अर्थातच सोमवार ते शनिवार पर्यंत लोकलमध्ये अधिक गर्दी राहते. सुट्टीच्या दिवसात मात्र किंचित गर्दी कमी असते. खरंतर, मुंबई आणि मुंबई शहरालगत वसलेल्या उपनगरातील नागरिकांचा प्रवास लोकलवर अवलंबून आहे.
शहरातील आणि उपनगरातील लाखो लोक दररोज लोकलने प्रवास करतात. यामुळे मुंबईमधील लोकलला मुंबईची लाईफ लाईन म्हणजेच जीवितवाहिनी म्हणून ओळखले जाते. पण या लाईफ लाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकलमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते.
मुंबई शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असताना वाढत्या लोकसंख्येमुळे लोकलवर मोठा ताण येत आहे. लोकलमध्ये नागरिकांना पाय ठेवण्यासाठी देखील जागा मिळत नाहीये. परिणामी लोकलचा प्रवास खूपच जीवघेणा ठरू लागला आहे.
लोकलमध्ये मोठी गर्दी होत असल्याने अपघातांच्या संख्येत देखील मोठी वाढ झाली आहे. हेच कारण आहे की, मुंबईमध्ये लोकलची गर्दी कमी करण्यासाठी विविध उपाय योजना राबवल्या जात आहेत. रेल्वे कडून लोकलमधील गर्दी कमी व्हावी यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत आणि तोडगे काढले जात आहेत.
मात्र असे असले तरी अजूनही लोकलमधील गर्दी पूर्णपणे कमी झालेले नाही. हेच कारण आहे की मध्य रेल्वेने आता मध्य रेल्वे मार्गावर धावणाऱ्या लोकलमधील गर्दीला आटोक्यात ठेवण्यासाठी एक नवीन मास्टर प्लॅन तयार केला आहे.
या प्लॅनमुळे लोकलमधील गर्दी बऱ्यापैकी कमी होईल अशी आशा मध्य रेल्वेला लागून आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लोकल मधील गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळेत बदल केला आहे. मात्र हा निर्णय घेऊनही लोकलमध्ये गर्दी होतच आहे.
पण आता ही गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने मुंबईतील सरकारी, निमसरकारी कार्यालयासह ३५० संस्थांसोबत चर्चा सुरू केली असून मुंबई शहरातील आणि उपनगरातील रुग्णालये, महापालिका, पोलीस प्रशासन, लोकप्रतिनिधी, प्रसिद्धीमाध्यमे, खासगी संस्था, बँकांना त्यांच्या कामाच्या वेळेत बदल करण्याची विनंती या ठिकाणी करण्यात आली आहे.
यासाठी संबंधित संस्थांना पत्र देखील पाठवण्यात आले आहे. दरम्यान मध्ये रेल्वेने केलेल्या या विनंतीला जर मान दिला आणि शहरातील संस्थांनी याबाबत सकारात्मक निर्णय घेतला तर लोकलमधील गर्दी आटोक्यात येईल अशी आशा आहे. यामुळे आता याबाबत नेमका काय निर्णय घेतला जातो याकडे मुंबईकरांचे विशेष लक्ष लागून राहणार आहे.