Mumbai Local Railway News : मुंबईकरांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. मुंबईची लाईफलाईन अर्थातच मुंबई लोकल रेल्वे बाबत नुकताच शिंदे फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता राजधानी मुंबईमधील लोकल प्रवास अधिक गतिमान होण्यास मदत होणार आहे. खरं पाहता मुंबई शहर आणि उपनगरात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढत आहे.
लोकसंख्येसोबतच वाहनांची संख्या देखील मोठी विस्तारली आहे. यामुळे शहरात प्रदूषणाचा स्तर चिंताजनक बनला आहे. अशा परिस्थितीत आता शासनाच्या माध्यमातून प्रदूषणावर आणि वाहतूक कोंडीवर उपाययोजना म्हणून सार्वजनिक वाहतुकीला चालना देण्यासाठी वेगवेगळे प्रकल्प कार्यान्वित केले जात आहेत. याच उपाय योजनेचा एक भाग म्हणून मुंबईतील रेल्वे स्थानकांत सुधारणांसह नव्या रेल्वेमार्गची उभारणी केली जाणार आहे.
यानुसार आता एमयूटीपी 3 अ प्रकल्पसंचासाठी 7 हजार कोटी रुपयांच्या कर्जउभारणीला नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे या प्रकल्पांसाठी जी काही आर्थिक अडचण भासत होती ती दूर होण्यास मदत होणार आहे. यामुळे हे प्रकल्प अधिक गतीने पूर्ण होतील आणि मुंबईकरांचा लोकलचा प्रवास आणखी गतिमान होणार आहे.
जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार शासनाने कर्ज उभारणीसाठी मंजुरी दिली असल्याने आता या निधीतून तिन्ही मार्गांवर संवादरहित सिग्नल यंत्रणा सीबीटीसी कार्यान्वित करण्यात येणार आहे. तसेच आता 18 स्थानकांमध्ये सुधारणा आणि 191 एसी लोकलच्या बांधणीचा मार्गही मोकळा झाला आहे. खरं पाहता, बीजेपी शिवसेना सरकारमध्ये असताना तत्कालीन मुख्यमंत्री आणि वर्तमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 55 हजार कोटींचा एमयूटीपी प्रकल्प उभारण्याचे ठरवले होते.
हे पण वाचा :- शेवटी निर्णय झालाच ! ‘या’ महिन्यात येणार पीएम किसानचा चौदावा हप्ता, तारीख डिक्लेर झाली? पहा….
या प्रकल्पाला मंजुरीसाठी केंद्राकडे पाठवण्यात आले. मात्र, केंद्राच्या नीती आयोगाने हरकत घेतली. निती आयोगाने त्यावेळी सीएसएमटी-पनवेल उन्नत मार्ग आणि विरार- पनवेल उपनगरी मार्ग वगळण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार, नवीन प्रस्ताव केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला. मग 2019 मध्ये केंद्र सरकारने सुधारित MUTP 3 अ ला मंजुरी दिली. मात्र, तदनंतर राज्यात सत्ता बदल झाला.
बीजेपी सत्ता बाहेर गेली आणि महाविकास आघाडी सरकार आले. या सरकारने मात्र याला मंजुरी दिली नाही. आता मात्र शिंदे सरकारने या सुधारित प्रकल्पसंचाला अर्थसहाय्य उभारण्यासाठी मंजुरी दिली आहे. यामुळे आता या प्रकल्पाला गती मिळणार असून लवकरच मुंबईकरांचा लोकलचा प्रवास अधिक सोयीचा आणि गतिमान होणार आहे.
हे पण वाचा :- मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसबाबत महत्वाची बातमी; ट्रेनच्या वेळेत होणार मोठा बदल, रेल्वे मंत्री म्हटले की…..