Mumbai Local Railway : मुंबई लोकलला मुंबईची लाईफ लाईन म्हणजेच जीवनवाहिनी म्हणून ओळखले जाते. याचे कारण म्हणजे मुंबईच्या लोकलने रोजाना लाखों प्रवासी प्रवास करतात. लाखो मुंबईकरांसाठी लोकल ही लाईफ लाईनच आहे. दरम्यान या लाईफ लाईन बाबत एक अतिशय महत्त्वाचे अपडेट हाती आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी पश्चिम रेल्वे मार्गावरील आणि मध्य रेल्वे मार्गावरील काही लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वे कडून काही तांत्रिक कामांसाठी मेगाब्लॉक घेतला जाणार असून या ब्लॉकच्या पार्श्वभूमीवर लोकलच्या बहुतांशी फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
रेल्वे प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, रेल्वेरुळांसह सिग्नलच्या देखभाल-दुरुस्तीसाठी मध्य रेल्वेने ठाणे ते कल्याण आणि पनवेल ते वाशी दरम्यान मेगा ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा ब्लॉक रविवारी दिवसा घेतला जाणार आहे.
पश्चिम रेल्वे कडून देखील वसई रोड ते वैतरणादरम्यान ब्लॉक घेतला जाणार आहे. मात्र हा ब्लॉक आज अर्थातच शनिवारी मध्यरात्री घेतला जाणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
यामुळे मध्ये आणि पश्चिम रेल्वेच्या माध्यमातुन घेण्यात येणाऱ्या या ब्लॉकमुळे लोकलच्या काही फेऱ्या रद्द केल्या जाणार आहेत तर काही फेऱ्या विलंबाने धावणार आहेत. यामुळे आज आपण कोणत्या लोकल फेऱ्या रद्द होणार आणि कोणत्या लोकल फेऱ्या विलंबाने धावणार याबाबत थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वे कडून ठाणे ते कल्याण स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर उद्या अर्थातच रविवारी सकाळी 10:40 ते दुपारी 3:40 दरम्यान ब्लॉक घेतला जाणार आहे. याचा परिणाम म्हणून अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल फेऱ्या धीम्या मार्गावर वळवल्या जाणार आहेत.
याचा परिणाम म्हणून काही लोकल रद्द राहणार आहेत तर काही विलंबाने धावणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. हार्बर रेल्वे मार्गावरील पनवेल ते वाशी या स्थानकादरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11 वाजून पाच मिनिटांनी ते सायंकाळी चार वाजून पाच मिनिटांपर्यंत मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे.
या ब्लॉकमुळे सीएसएमटी ते पनवेल/बेलापूर, ठाणे ते पनवेल, नेरूळ ते ठाणे, नेरूळ ते खारकोपरदरम्यान धावणाऱ्या अप आणि डाऊन लोकल फेऱ्या उद्यासाठी बंद राहणार आहेत. पण सीएसएमटी ते वाशी, ठाणे ते वाशी आणि बेलापूर ते खारकोपर दरम्यानच्या लोकल फेऱ्या नियमित सुरू राहणार अशी माहिती समोर आली आहे.
पश्चिम रेल्वे कडून वसई रोड स्थानक ते वैतरणास्थानकदरम्यान आज अर्थातच शनिवारी मध्य रात्री 11:50 ते रविवारी पहाटे 4:30 दरम्यान ब्लॉक घेतला जाणार आहे. या ब्लॉकमुळे काही लोकल फेऱ्या रद्द केल्या जाणार आहेत. तसेच काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत. यात विरार-भरूच मेमू रविवारी पहाटे ४.३५ ऐवजी ४.५० वाजता विरार स्थानकातून धावणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.