Mumbai-Jalna Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेस ही भारतातील संपूर्ण मेक इन इंडिया प्रोजेक्ट अंतर्गत तयार झालेली पहिली हायस्पीड ट्रेन आहे. ही गाडी 2019 मध्ये सुरू झाली आणि अवघ्या 5 वर्षांच्या काळात संपूर्ण देशात ही गाडी लोकप्रिय बनली आहे.
राजधानी आणि शताब्दी पेक्षाही वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास करण्यास विशेष पसंती दाखवली जात आहे. यामुळे संपूर्ण देशात वंदे भारत एक्सप्रेसचे जाळे तयार करण्याचे नियोजन भारतीय रेल्वेने आखले आहे.
शासन देखील या गाडीची लोकप्रियता पाहता देशातील सर्वच महत्त्वाच्या मार्गावर या गाडीला सुरू करण्यासाठी कटिबद्ध आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी देशात 4,500 वंदे भारत एक्सप्रेस चालवल्या जातील अशी मोठी घोषणा केली आहे.
सिंधिया यांनी 2047 पर्यंत शासन हे टार्गेट पूर्ण करणार अशी ग्वाही देखील दिली आहे. विशेष म्हणजे मीडिया रिपोर्ट मध्ये तर मार्च 2024 पर्यंत देशातील 75 महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू होऊ शकते असा दावा केला जात आहे. सध्या स्थितीला देशातील 34 महत्त्वाच्या मार्गावर ही गाडी धावत आहे.
पहिली वंदे भारत एक्सप्रेस वाराणसी ते नवी दिल्ली यादरम्यान सुरू झाली आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने देशातील 34 महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे. आपल्या महाराष्ट्राचा विचार केला असता राज्यात सध्या सहा वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहेत.
राज्यातील मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव, मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, नागपूर ते बिलासपुर, इंदोर ते नागपूर या सहा मार्गांवर ही गाडी सुरू आहे.
विशेष बाब म्हणजे मुंबई ते जालना, मुंबई ते अहमदाबाद, मुंबई ते कोल्हापूर, पुणे ते वडोदरा, पुणे ते सिकंदराबाद या मार्गावर देखील ही गाडी सुरू करण्याचे नियोजन आहे. अशातच मुंबई ते जालना दरम्यान सुरू केल्या जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई – जालना वंदे भारत सुरू करण्यासाठी या मार्गांवर सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधा विकसित केल्या जात आहेत. खरेतर मार्च महिन्यात जालना – मनमाड या मार्गावर रेल्वेची गती ताशी १३० किमीपर्यंत वाढवण्यास मान्यता देण्यात आली आहे.
या मार्गातील विदयुतीकरण, सिग्नल यंत्रणा, रेल्वे मार्गाचे मजबुतीकरण ही सर्व कामे आता पूर्ण झाली आहेत. ही सर्व आवश्यक कामे पूर्ण झाली असल्याने आता वर्षाखेरीस मुंबई – जालना वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला जाऊ शकतो असा दावा काही मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे.
ही गाडी पहाटे साडेपाच वाजता जालना येथून मुंबईच्या दिशेने रवाना होईल अशी देखील माहिती समोर येत आहे. मात्र रेल्वे बोर्डाने याबाबत कोणतीच माहिती दिलेली नाही. म्हणून या गाडीचे वेळापत्रक कसे राहणार आणि ही गाडी खरंच या चालू वर्षाखेरीस सुरू होणार का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.