Mumbai Highway : राजधानी मुंबई आणि उपनगरात वाहतूक कोंडी हा प्रश्न जटील बनत चालला आहे. वाढती लोकसंख्या, वाढती वाहनांची संख्या, आणि वाढत औद्योगिकरण यामुळे मुंबई व उपनगरात वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर शहर व उपनगरातील ट्रॅफिकची समस्या कमी करण्यासाठी वेगवेगळे रस्ते विकासाची कामे हाती घेण्यात आली आहेत.
एमएमआरडीए अर्थातच मुंबई मेट्रोपोलीटन रिजन ऑथॉरिटी म्हणजे मुंबई प्रदेश विकास प्राधिकरण यांच्या माध्यमातून एकाच वेळी अनेक प्रकल्पावर काम सुरू आहे. आता एम एम आर डी ए च्या माध्यमातून या प्रकल्पांसाठी निधी उभारणे हेतू मुंबईमधील टोल वसुलीचे अधिकार सरकारकडे मागितले जात आहेत.
यामुळे भविष्यात मुंबई व उपनगरातील रस्ते प्रकल्पासाठी एम एम आर डी ए प्राधिकरणाला पैशांची चणचण भासणार नसल्याचे सांगितले जात आहे. सध्या एमएमआरडीए कडून मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, कोस्टल रोड, विरार-अलिबाग कॉरिडॉर, वसई-भाईंदर पूल, वर्सोवा-वांद्रे सी-लिंक आणि वांद्रे-वरळी सी-लिंक यांसारखी कामे हाती घेण्यात आली आहेत.
हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! 50,000 प्रोत्साहन अनुदानाची चौथी अन अंतिम यादी जाहीर; ‘या’ पद्धतीने चेक करा यादीत आपलं नाव
ही कामे सुरू असतानाच आणखी एक मोठा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. एम एम आर डी एन ए ने ठाणे ते घाटकोपर दरम्यान डबल डेकर मार्ग विकसित करण्याचे नियोजन आखल आहे. हा मार्ग सध्याच्या इस्टर्न एक्सप्रेस वे वर बांधला जाणार असून याच अंतर 13 किलोमीटर लांबीच राहणार आहे.
हा मार्ग घाटकोपरच्या छेडानगर जंक्शन ते ठाणे मधील आनंदनगर पर्यंत राहणार आहे. वास्तविक मुंबई ते उरण म्हणजेच नवी मुंबई यांना जोडणारा ट्रान्स हार्बर लिंक हा प्रकल्प जवळपास अंतिम टप्प्यात आला आहे. या प्रकल्पाचे काम एकूण चार टप्प्यात सुरू असून येत्या ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यापर्यंत या प्रकल्पाचे पूर्ण काम होण्याची आशा आहे.
काम पूर्ण झाल्यानंतर हा प्रकल्प लगेचच वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन प्राधिकरणाच्या माध्यमातून आखलं गेल आहे. तरीदेखील हा प्रकल्प या वर्षाच्या अखेर किंवा पुढल्या वर्षी अगदी सुरुवातीलाच प्रवाशासाठी सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे.
हे पण वाचा :- ब्रेकिंग ! राज्यातील सर्व महिलांना अर्ध्या तिकिटावर एसटीचा प्रवासाची योजना; ‘या’ महिन्यापासून होणार लागू, पहा डिटेल्स
हा प्रकल्प सुरु झाल्यानंतर मात्र मुंबई ट्रान्स हार्बर लिंक कडून येणारी वाहने शिवडी वरून एस्टरन फ्रीवेचा वापर करून काही मिनिटातच घाटकोपरला पोहोचणार आहेत. यामुळे वाहतूक कोंडीची समस्या अजूनच जटील होऊ शकते. परिणामी यावर उपाययोजना आत्तापासूनच सुरू करणे आवश्यक असल्याने हा डबल डेकर मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे.
या डबल डेकर मार्गाबाबत एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मुंबई लाईव्ह या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, या मार्गाचा अभ्यास हा जवळपास पूर्ण झाला आहे. म्हणजेच आता या प्रकल्पाचा डीपीआर तयार होणार आहे. हा 13 किलोमीटर लांबीचा घाटकोपरच्या छेडानगर जंक्शन ते ठाण्याच्या आनंदनगर दरम्यान असलेला डबल डेकर मार्ग मुंबईमधील सर्वाधिक लांबीचा डबल-डेकर मार्ग राहणार आहे.
हा एक सहा लेनचा मार्ग असेल म्हणजे दोन्ही बाजूंनी वाहतुकीसाठी तीन-तीन लेन या अंतर्गत विकसित केल्या जाणार आहेत. निश्चितच या प्रकल्पामुळे भविष्यात घाटकोपर दरम्यानची वाहतूक कोंडी निस्तारण्यास मदत होणार आहे.
हे पण वाचा :- आता टाटा तयार करणार वंदे भारत ट्रेन ! येत्या 2 वर्षात धावणार तब्बल 200 वंदे भारत एक्सप्रेस, पहा रेल्वेच नियोजन