Mumbai High Court Recruitment : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. विशेषता मुंबईमध्ये नोकरी करायचे असेल अशा तरुणांसाठी ही आनंदाची परभणी राहणार आहे. ज्या तरुणांची शिक्षण कमी आहे मात्र त्यांना नोकरीची गरज आहे अशांसाठी देखील ही बातमी विशेष खास आहे कारण की मुंबई उच्च न्यायालयात एक मोठी भरती आयोजित झाली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाकडून शिपाई/हमाल या पदासाठी भरती काढण्यात आली असून यासाठीची अधिसूचना नुकतीच जारी झाली आहे. शिपाई/हमाल या पदासाठी मात्र सातवी पास उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी आज आपण या भरती संदर्भात संपूर्ण माहिती घेऊन हजर झालो आहोत.
हे पण वाचा :- कापूस उत्पादकांसाठी आनंदाची बातमी; सलग तिसऱ्या दिवशी पांढऱ्या सोन्याच्या दरात वाढ, आणखी वाढणार का भाव?
किती पदांसाठी आहे भरती
मुंबई हायकोर्टाकडून शिपाई/हमाल या पदाच्या एकूण 160 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
अर्ज करण्याची पद्धत अन अर्जाची शेवटची दिनांक
इच्छुक आणि पात्र उमेदवारांना यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. https://bhc.gov.in/bhcpeonrecruitment2023/home.php या वेबसाईटवर जाऊन इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज 7 एप्रिल 2023 पर्यंत सादर करता येणार आहेत. यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करायचा आहे.
हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी खुशखबर ! आता मेट्रोचा प्रवास होणार स्वस्त, मुंबई मेट्रो जारी करणार पास, पहा कसा राहणार पासचा दर
शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा
18 ते 38 वर्ष वयोगटातील उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकणार आहेत. मागासवर्गीयांसाठी मात्र पाच वर्षांची सूट राहणार आहे. तसेच शैक्षणिक पात्रतेबाबत बोलायचं झालं तर सातवी पास उमेदवार या पदासाठी अर्ज करण्यास पात्र राहणार आहे.
पगार किती
या पदासाठी 15000 ते 47 हजार 600 रुपये पर्यंत वेतन राहणार आहे.
नोकरी करण्याचे ठिकाण
नोकरी करण्याचे ठिकाण हे मुंबई हायकोर्ट राहणार आहे.
जाहिरात कुठं
जाहिरात बघण्यासाठी बॉम्बे हायकोर्ट रिक्रुटमेंट 2023 या लिंक वर क्लिक करा.
हे पण वाचा :- पुणे, सोलापूर वासियांसाठी महत्त्वाची बातमी; पुणे-सिकंदराबाद वंदे भारत ट्रेन केव्हा सुरु होणार? पहा