Mumbai Goa Vande Bharat Train : महाराष्ट्राला काल अर्थातच 30 सप्टेंबर 2023 रोजी एक नवीन वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळाली आहे. काल मुंबई-जालना वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला आहे. यामुळे आता राज्यातील वंदे भारत एक्सप्रेसची संख्या सात एवढी झाली आहे.
आता राज्यात मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते साईनगर शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते मडगाव, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते जालना, नागपूर ते बिलासपुर आणि इंदोर ते नागपूर या मार्गावर ही गाडी सुरू झाली आहे.
दरम्यान या सात गाड्यांपैकी मुंबई ते गोवा अर्थातच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते मडगाव या गाडीबाबत अतिशय महत्त्वाचे आणि मोठे अपडेट समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या वंदे भारत ट्रेनला कोकण रेल्वे मार्गावरील एक अतिशय महत्त्वाच्या आणि मोठ्या रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला आहे.
याबाबत राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी केसरकर यांची केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या समवेत महत्वाची बैठक पार पडली आहे.
या बैठकीत केसरकर यांनी रेल्वे मंत्र्यांकडे विविध मागण्या ठेवल्यात. यामध्ये मुंबई ते गोवा वंदे भारत एक्सप्रेसला सावंतवाडी या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा देण्याची मागणी देखील होती.
दरम्यान या मागणीला केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सकारात्मक प्रतिसाद दाखवला आहे. वैष्णव यांनी ही मागणी मान्य केली आहे.
यामुळे आता मुंबई गोवा वंदे भारत ट्रेन सावंतवाडी या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे. परिणामी सावंतवाडी रेल्वे स्थानकावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.