Mumbai Goa Vande Bharat Express : मुंबई ते गोवा आणि गोवा ते मुंबई असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी सणासुदीच्या काळात एक मोठी बातमी समोर आली आहे. या मार्गावरील प्रवाशांचा प्रवास आता गतिमान होणार आहे. या मार्गावरील 10 तासाचा प्रवास आता फक्त पावणे आठ तासात पूर्ण होणार आहेत.
जसं की आपणास ठाऊकच आहे की, मुंबई येथे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोवा येथील मडगाव दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरु करण्यात आली आहे. पण पावसाळी काळात होणारे अपघात टाळण्यासाठी या वंदे भारत एक्सप्रेसचा वेग हा कमी करण्यात आला होता. शिवाय आतापर्यंत ही गाडी पावसाळी वेळापत्रकाप्रमाणे आठवड्यातून फक्त तीनच दिवस चालवली जात होती.
मात्र आता एक नोव्हेंबर 2023 पासून पावसाळी वेळापत्रक संपणार आहे. यामुळे आता एक नोव्हेंबर पासून ही गाडी नॉन मान्सून वेळापत्रकानुसार चालवले जाणार आहे. आता ही गाडी आठवड्यातून सहा दिवस धावणार आहे. शिवाय या गाडीचा वेगही वाढवला जाणार आहे. यामुळे सणासुदीच्या काळात या मार्गावरील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल असा आशावाद व्यक्त होत आहे.
सध्या पावसाळी काळात या गाडीने प्रवास करण्यासाठी प्रवाशांना 10 तासांचा वेळ खर्च करावा लागत आहे. पण आता एक नोव्हेंबर पासून ही गाडी 7 तास आणि 45 मिनिटातच हा प्रवास पूर्ण करू शकणार आहे. म्हणजे प्रवासाच्या वेळेत तब्बल 2 तासाची बचत होणार आहे. एकंदरीत, मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोवा येथील मडगाव दरम्यान सुरू करण्यात आलेली वंदे भारत एक्सप्रेस आता नॉन मान्सून वेळापत्रकाप्रमाणे धावणार आहे.
यानुसार, आता ही गाडी शुक्रवार वगळता आठवड्यातून 6 दिवस नियमितपणे धावणार आहे. अशा परिस्थितीत आता आपण या गाडीचे नॉन मान्सून वेळापत्रक कसे राहील याविषयी थोडक्यात जाणून घेऊया.
कसं असेल नॉन मान्सून वेळापत्रक ?
नॉन मॉन्सून वेळापत्रकाप्रमाणे एक नोव्हेंबर 2023 पासून मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस शुक्रवार वगळता आठवड्यातील 6 दिवस धावणार आहे. आता एक नोव्हेंबरपासून या मार्गावरील वंदे भारत ट्रेन सीएसएमटी मुंबईहून ०५.२५ वाजता निघणार आहे आणि पावणे आठ तास प्रवास करून दुपारी १ वाजून १० मिनिटांनी ही गाडी मडगाव येथे पोहोचणार आहे. तसेच मडगावहून दुपारी २.४० वाजता ही गाडी सुटेल आणि रात्री १० वाजून २५ मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे पोहोचणार आहे.