Mumbai Goa Vande Bharat Express : मुंबईहून गोव्याच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आणि कोकणवासीयांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. लवकरच राजधानी मुंबईहून गोव्याला कनेक्ट होणारी वंदे भारत ट्रेन धावणार आहे. मुंबई गोवा रेल्वे मार्गावर विद्युतीकरणाची काम पूर्ण झाली आहेत. यामुळे आता लवकरच वंदे भारत ट्रेन या रूटवर धावेल अशी माहिती हाती आली आहे.
रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई गोवा रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरणाची कामे पूर्ण झाली आहेत मात्र या कामाची पाहणी अजून बाकी आहे. या परिस्थितीत कामाची पाहणी पूर्ण झाल्यानंतर रूटवर वंदे भारत ट्रेन सुरू होणार असल्याचे त्यांनी भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांना माहिती दिली आहे. यामुळे याचा सर्वाधिक फायदा कोकणवासियांना होणार असून त्यांचा प्रवास जलद होईल अशी आशा पुन्हा एकदा व्यक्त होऊ लागली आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की कोकणातील भाजपाच्या आमदारांनी केंद्रे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांची राजधानी मुंबईत भेट घेतली. या भेटीदरम्यान भाजपाच्या आमदारांनी मंत्री महोदय यांच्याकडे कोकणातील प्रवासांचा प्रवास वेगवान होण्यासाठी ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते शिर्डी यादरम्यान वंदे भारत ट्रेन सुरू करण्यात आली आहे त्याच धर्तीवर मुंबई ते गोवा वंदे भारत ट्रेन सुरू केली जावी अशी मागणी केली आहे.
हे पण वाचा :- मोठी बातमी ! नासिक-पुणे रेल्वेसाठी दिलेली स्थगिती नजरचुक, महारेलचा दावा; आता सुरू होणार का भूसंपादन, वाचा?
भाजपा आमदार प्रवीण दरेकर, निरंजन डावखरे, गणपत गायकवाड, प्रसाद लाड या आमदारांनी ही मागणी केली. आमदारांच्या या मागणीनंतर रावसाहेब दानवे यांनी मुंबई गोवा रेल्वे मार्गावर विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले असल्याची माहिती त्यांना दिली.
सोबतच या रेल्वे मार्गाची पाहणी झाल्यानंतर लगेचच वंदे भारत ट्रेन या रूटवर सुरू करू अस आश्वासन देखील यावेळी दिल. निश्चितच दस्तूर खुद्द केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री यांनी दिलेलं हे आश्वासन कोकणवासीयांसाठी महत्त्वाचे असून या रूटवर वंदे भारत ट्रेन धावली तर मुंबई ते गोवा दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मौजा-ही-मौजा होणार आहे.
हे पण वाचा :- पुणे-मुंबई मिसिंग लींक : मोठी बातमी! ‘या’ महिन्यात होणार काम पूर्ण; एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिली माहिती