Mumbai Goa Travel : मुंबईहून गोव्याला प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी तसेच देशाची आर्थिक राजधानी म्हणून संपूर्ण जगात ख्यातीप्राप्त आहे. मुंबई हे एक प्रमुख पर्यटन केंद्र देखील आहे.
यासोबतच गोवा हे देखील एक प्रमुख पर्यटन केंद्र आहे. अशा परिस्थितीत मुंबईहून गोव्याला आणि गोव्याहून मुंबईला येणाऱ्यांची संख्या विशेष उल्लेखनीय आहे. दरम्यान आता या दोन्ही शहरांदरम्यानचा प्रवास गतिमान होणार आहे.
आता मुंबई ते गोवा प्रवास जलद होणार असल्याचे सांगितले जात आहे. खरं पाहता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून मुंबई शहर आणि उपनगरात वेगवेगळ्या विकासाची कामे हाती घेण्यात आली आहेत. यामध्ये मुंबई ट्रान्स हार्बर लिंक या महत्त्वाच्या प्रकल्पाचा देखील समावेश आहे.
वास्तविक हा प्रकल्प मुंबई आणि नवी मुंबई या दोन शहरांना जोडण्यासाठी हाती घेण्यात आला आहे. मात्र याचा लाभ हा मुंबई ते गोवा दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना देखील होणार आहे. अशातच आता मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रोजेक्ट बाबत एक मोठ अपडेट हाती आल आहे. हे अपडेट आहे या मार्गाच्या उद्घाटनाबाबत. चला तर मग जाणून घेऊया याबाबत सविस्तर माहिती.
मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाबाबत थोडक्यात
मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प अंतर्गत सागरी मार्ग विकसित केला जात असून दक्षिण मुंबईतील शिवडीपासून हा मार्ग सुरू होतो आणि एलिफंटा बेटाच्या उत्तरेला ठाणे खाडी ओलांडल्यानंतर चार्लीजवळ संपतो. हा 22 किलोमीटर लांबीचा सागरी मार्ग तयार केला जात आहे. या प्रकल्पाच्या कामाला 2018 मध्ये सुरुवात झाली आहे. म्हणजे जवळपास पाच वर्षांपासून काम सुरू आहे.
एम एम आर डी ए कडून हा प्रकल्प विकसित होत असून आता प्राधिकरणाने 2023 मध्येच हा प्रकल्प सुरू करण्याचे नियोजन आखले आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी 17,843 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे.
वास्तविक हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर साडेचार वर्षात याचे काम पूर्ण करण्याचा मानस प्राधिकरणाचा होता मात्र कोरोना काळामध्ये हे काम रखडले आणि यामुळे या प्रकल्पाचे काम जवळपास आठ महिना उशीर होईल असे सांगितले जात आहे. म्हणजेच या प्रकल्पाचे काम नाताळ पर्यंत पूर्ण होणार आहे. अर्थातच आता मुंबई ट्रान्स हार्बर लिंक या प्रकल्पाचे उद्घाटन नाताळमध्ये होणार आहे.
वास्तविक, हा सागरी पूल किंवा मार्ग पूर्वेकडील मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाला पश्चिमेकडील कोस्टल रोडशी जोडणार आहे. म्हणजे याचे काम पूर्ण झाल्यानंतर मुंबईकरांना गोव्यात जाणे सोपे होणार आहे. वास्तविक मुंबई ते नवी मुंबई हे अंतर पार करण्यासाठी सध्या अडीच तासांचा कालावधी लागतो मात्र हा सागरी मार्ग तयार झाल्यानंतर मात्र 25 मिनिटात मुंबई ते नवी मुंबई हे अंतर पार करता येणार आहे.
याचाच अर्थ आता मुंबई ते गोवा असा प्रवास करण्यासाठी मुंबईकरांचे दोन तास वाचणार आहेत. निश्चितच हा प्रकल्प मुंबई ते नवी मुंबई प्रवासासाठी महत्त्वाचा तर आहेच शिवाय यामुळे मुंबई ते गोवा हा प्रवास देखील सुसाट होणार आहे.