Mumbai Flyover Will Close : मुंबईकरांसाठी एक अतिमहत्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे विलेपार्ले येथील कॅप्टन विनायक गोरे रोड ओव्हरब्रिज संदर्भात. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, हा ओव्हर ब्रिज काही काळासाठी बंद राहणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 11 एप्रिल ते 26 एप्रिल दरम्यान काही कालावधीसाठी हा पूल बंद ठेवण्याचा निर्णय झाला आहे.
याबाबत पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, उपनगरांच्या पश्चिम आणि पूर्वेला जोडणारा हा पूल 11 एप्रिल ते 26 एप्रिल दरम्यान मध्यरात्रीनंतर म्हणजेच सकाळी एक वाजेपासून ते चार वाजेपर्यंत बंद राहणार आहे. या कालावधीमध्ये या पुलावर कोणत्याच प्रकारची वाहतूक होणार नसल्याची माहिती एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्टच्या माध्यमातून समोर आली आहे.
हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी खुशखबर ! आता पुण्याचा प्रवास होणार सुसाट; ‘या’ अति महत्त्वाच्या प्रकल्पाला एमएमआरडीएची मंजुरी, पहा….
आयआयटी बॉम्बेच्या एका टीमने सेफ्टी ऑडिटचा भाग म्हणून नुकतीच या पुलाची पाहणी केली आहे. या पाहणीनंतर हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. 26 एप्रिल नंतर मात्र हा पूल पूर्ववत वाहतुकीसाठी खुला राहणार आहे. दरम्यान तात्पुरत्या स्वरूपात घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे या परिसरात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.
जसं की आपणास ठाऊकच आहे की, अंधेरी येथील गोखले पूल बंद आहे. सध्या गोखले पुलाचे पुनर्बांधणीचे काम सुरू आहे. यामुळे हा पूल नेमका केव्हा सुरू होतो याकडे देखील लक्ष आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात महापालिकेने हा पूल बंद केला असून या पुलाची आता पुनर्बांधणी केली जात आहे. या पुलाचे पुनर्बांधणीचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.
पावसाळ्यापूर्वी गोखले पुलाच्या दोन लेन सुरू करण्याचा मानस महापालिकेचा आहे. दरम्यान आता विलेपार्ले येथील कॅप्टन विनायक गोरे रोड ओव्हरब्रिज ज्याला सामान्यता विलेपार्ले पूल म्हणून ओळखले जाते तो पूल 11 एप्रिल ते 26 एप्रिल दरम्यान मध्यरात्रीनंतर म्हणजेच सकाळी एक ते चार पर्यंत बंद राहणार असल्याने या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ शकते असं मत प्रवाशांनी व्यक्त केले आहे.
निश्चितच या परिसरातील नागरिकांना प्रामुख्याने सकाळी एक ते चार दरम्यान या पुलावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. 26 एप्रिल नंतर हा पूल पूर्ववत वाहतुकीसाठी पुन्हा सुसाट होणार आहे म्हणजे 26 एप्रिल नंतर 24 तास हा पूल प्रवाशांच्या सेवेत राहणार आहे.
हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी खुशखबर ! ‘हा’ चर्चित अन अतिमहत्वाचा मेट्रो मार्ग ‘या’ तारखेला होणार सुरु, पहा डिटेल्स