Mumbai Famous Fish Market : नुकत्याच काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरात गणेशोत्सवाचा सण मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे. गणेशोत्सव आणि नवरात्र उत्सव हे दोन असे सण आहेत ज्यामध्ये हिंदू कुटुंबात नॉनव्हेज पूर्णपणे बंद असते. गणेशोत्सवाच्या आधी येणाऱ्या श्रावण महिन्यात देखील नॉनव्हेज खाल्ले जात नाही. अशा परिस्थितीत गणेशोत्सवाचा सण पार पडल्यानंतर अनेकांनी नॉनव्हेजवर ताव मारायला सुरुवात केली आहे.
गणेशोत्सवाचा सण थाटामाटात संपन्न झाल्यानंतर चिकन मटन आणि फिश खरेदी करण्यासाठी खवय्यांची तुफान गर्दी पाहायला मिळाली. आता नॉनव्हेज प्रेमी मोठ्या आनंदाने चिकन मटण आणि मासे सेवन करू शकणार आहेत. अनेक जण रविवारी आवर्जून मासे खातात.
अशा परिस्थितीत मुंबईमधील अनेकांच्या माध्यमातून मुंबईतील सर्वात फेमस फिश मार्केट कोणते आहे अशी विचारणा केली जात होती? यामुळे आता आपण मुंबईमधील सर्वात फेमस फिश मार्केट ची माहिती पाहणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया मुंबईमधील सर्वाधिक लोकप्रिय फिश मार्केट ची माहिती.
हे आहे मुंबईमधील सर्वात फेमस फिश मार्केट
मालाडमधील मासळी बाजार हे मुंबईमधील सर्वाधिक प्रसिद्ध फिश मार्केट आहे. या ठिकाणी ग्राहकांना स्वस्त दरात आणि अगदीच उत्तम दर्जाचे मासे मिळतात. यामुळे जर तुम्हीही मुंबईत राहत असाल विशेषता मालाडच्या आजूबाजूला राहत असाल आणि मासे खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुम्ही मासे खरेदी करण्यासाठी या मार्केटला आवर्जून हजेरी लावली पाहिजे.
हे मुंबईतल्या सर्वाधिक प्रसिद्ध फिश मार्केटपैकी एक आहे. येथे तुम्हाला ताजे मासे मिळतात. म्हणून या ठिकाणाला खवय्यांची विशेष पसंती असते. इथं अनेक प्रकारचे मासे मिळतात. तुम्ही फक्त नाव सांगायचं काम आहे.
तुम्ही ज्या माशाचे नाव घेणार तो मासा तुम्हाला येथे खरेदी करता येणार आहे. केवळ सामान्य नागरिकांनाचं नाही, तर मोठमोठ्या हॉटेल आणि उपहारगृहांना देखील इथून मासे पुरवले जातात. जर तुम्हाला घरासाठी येथून मासे खरेदी करायची असतील तर दुपारनंतर तुम्ही या मार्केटमध्ये जावे.
हे मार्केट सकाळच्या वेळी होलसेल विक्रेत्यांसाठी आणि दुपारी 2 वाजल्यानंतर सामान्य नागरिकांसाठी सुरू असते. त्यामुळे तुम्हीही मासेप्रेमी असाल आणि रविवारी मासे खाण्याचा मूड बनला की या मार्केटला नक्कीच भेट देऊ शकता.
आजही तुमचा मासे बनवण्याचा प्लॅन असेल तर या मार्केटला तुम्ही जाऊ शकता. येथे तुम्हाला कमी किमतीत आणि खूपच ताजे, फ्रेश मासे मिळणार आहेत. या मार्केटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला नक्कीच येथे मासे कसे मिळतात याचा अनुभव येणार आहे.
जो व्यक्ती येथून एकदा मासे घेऊन जातो तो परत येथेच मासे खरेदी करण्यासाठी येतो. म्हणून तुम्हीही एकदा या मार्केटला भेट द्या आणि येथील किमती मालाची क्वालिटी आवर्जून चेक करा.
कसे आहेत येथील दर ?
बोंबील वाटा 100 रुपये, बांगडा 12 चा वाटा 200 रुपये, मोठी मुशी प्रत्येकी 100 ते 200 रुपये, कोळंबी वाटा 50 ते 200 रुपये. तर, लहान आकाराचे पापलेट 200 आणि मोठ्या आकाराचे पापलेट 1000 रुपयांपासून मिळतात. बाजारभावात चढ-उतार होत असते. भाव दररोज एकसारखेच राहणार नाहीत. मात्र हे आताचे दर आहेत. पुढे या किमती वाढू शकतात किंवा कमीही होऊ शकतात.