Mumbai Eye Project Details In Marathi : महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबई ही केवळ कॅपिटल सिटी नसून जगातील एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ आहे. मुंबईला मोठ ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्व आहे. यामुळे मुंबई पाहण्यासाठी रोजाना हजारो पर्यटक शहरात दाखल होत असतात. अशा परिस्थितीत शहरातील दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
शहरातील प्रवास अधिक गतिमान आणि आरामदायी करण्यासाठी मुंबईची लाईफ लाईन अर्थात लोकलचा विस्तार केला जात आहे. मेट्रोचे काम देखील जोरात सुरू आहे. यासोबतच मुंबईमधील पर्यटनाला चालना देण्यासाठी देखील प्रयत्न केले जात आहेत. मुंबई हे एक ग्लोबल पिकनिक स्पॉट असून देशातील एक महत्वाचं औद्योगिक शहर देखील आहे.
हे पण वाचा :- पुणेकरांसाठी गुड न्यूज ! आता शहराला मिळणार आणखी एक वंदे भारतची भेट, ‘या’ शहराशी थेट जोडलं जाणार Pune; पहा डिटेल्स
अशा परिस्थितीत मुंबईमध्ये लंडन आयच्या धरतीवर मुंबई आय प्रकल्प विकसित केला जाणार आहे. या प्रकल्प अंतर्गत एक उंच पाळणा तयार केला जाणार असून या पाळण्यात बसून आपली जीवाची मुंबई पर्यटकांना पाहता येणार आहे. यामुळे पर्यटनाला चालना मिळणार असून राजधानीचे विहंगम दृश्य आपल्या डोळ्यात पर्यटकांना साठवता येईल.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की हा प्रकल्प एमएमआरडीएच्या अर्थातच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून विकसित केला जाणार आहे. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया हा प्रकल्प नेमका कुठे उभारला जाणार आहे आणि प्रकल्पाचे वैशिष्ट्ये नेमके काय राहणार आहे याविषयी थोडक्यात.
हे पण वाचा :- पुण्याच्या शेतकरी बंधूंचा नादखुळा! भात पिकाला फाटा देत सुरू केली उन्हाळी हंगामात घेवड्याची शेती; झाली लाखोंची कमाई
मुंबई आय प्रकल्प नेमका आहे तरी काय?
आम्ही आपणास सांगू इच्छितो की इंग्लंडची राजधानी लंडन शहरमध्ये शहराचे विहंगमदृश्य टिकण्यासाठी थेम्स नदीच्या काठावर लंडन आय प्रकल्प उभारण्यात आला आहे. यां अंतर्गत 135 मीटर व्यासाचा उंच पाळणा बांधण्यात आला असून यातून लंडन शहराचे संपूर्ण दृश्य पाहता येते. याच धरतीवर आता मुंबईमध्ये मुंबई आय हा प्रकल्प उभारला जाणार असून या प्रकल्पांतर्गत समुद्र किनारी १२० ते १५० मीटर व्यासाचा उंच पाळणा तयार केला जाणार आहे.
यां पाळण्यातून जीवाच्या मुंबईचे दर्शन घेता येणार आहे. या प्रकल्पासाठी जवळपास दोन हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पाचे दोन टप्प्यात काम होणार असून पहिल्या टप्प्यात नेमका हा प्रकल्प कोठे उभारायचा म्हणजेच जागेची निश्चिती केली जाणार आहे तसेच दुसऱ्या टप्प्यात या प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम सुरू होणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार या प्रकल्पाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. मात्र अद्याप जागेची निश्चिती झालेली नाही.
या ठिकाणी उभारला जाऊ शकतो मुंबई आय
या प्रकल्पासाठी अद्याप जागेची निश्चिती झालेली नसली तरी देखील हा प्रकल्प वांद्रे रेक्लमेशन येथील एमएसआरडीसीच्या मालकीच्या जागेवर उभारण्याचा मानस मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा आहे. ही जागा अधिक व्यवहार्य असून मुंबई आय या ठिकाणी उभारण्याची शक्यता असल्याचा अंदाज बांधला जात आहे.
हे पण वाचा :- नवी मुंबई, डोंबिवलीवासियांसाठी महत्वाची बातमी; ऐरोली-काटई नाका उन्नत मार्ग ‘या’ महिन्यात होणार खुला