Mumbai Delhi Expressway : या चालू वर्षात देशात एकूण 9 राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. शिवाय पुढल्या वर्षी लोकसभा निवडणूक देखील राहणार आहे. अशा परिस्थितीत केंद्र शासनाच्या माध्यमातून वेगवेगळी विकासाची कामे पूर्ण करण्यासाठी जलद गतीने प्रयत्न केले जात आहेत. काही विकास कामांची लोकार्पण देखील होत आहे.
अशातच आज 12 फेब्रुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वात लांब महामार्गाचे उद्घाटन करणार आहेत. दिल्ली मुंबई द्रुतगती महामार्ग हा संपूर्ण जगातील लांब महामार्ग राहणार आहे. त्यामुळे हिंदुस्थानाच्या शिरेपेच्यात निश्चितच मानाचा तुरा रोवला जाणार असून वैश्विक पटलावर हिंदुस्थानाची ख्याती वाढणार आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, हा महामार्ग 1386 किलोमीटर लांबीचा राहणार आहे, विशेष बाब अशी की या महामार्गाच्या निर्मितीसाठी एक लाख कोटी रुपयांचा खर्च सध्या स्थितीला अपेक्षित आहे. हा महामार्ग संपूर्ण बांधून तयार झाल्यानंतर मुंबई ते दिल्ली हे अंतर मात्र 12 तासात कापता येणे शक्य होणार आहे. वास्तविक सध्या उपलब्ध असलेल्या मार्गाने जर राजधानी मुंबईहून राजधानी दिल्ली दरम्यान प्रवास केला तर प्रवाशांना 24 तासांचा कालावधी खर्च करावा लागतो.
परंतु या महामार्गाच्या निर्मितीनंतर निम्म्याने हे अंतर कमी होणार आहे. निश्चितच महाराष्ट्रासाठी हा महामार्ग विकासाचे द्वार खोलणारा राहणार आहे. समृद्धी महामार्गामुळे महाराष्ट्रात समृद्धी नांदेल तर दिल्ली मुंबई महामार्गामुळे महाराष्ट्रात आर्थिक मांदियाळी नांदेल असं जाणकार देखील नमूद करत आहेत. खरं पाहता, महाराष्ट्राला या महामार्गामुळे एकूण पाच राज्याला थेट कनेक्टिव्हिटी लाभणार आहे. दरम्यान आता या महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे म्हणजेच हरियाणा मधील सोहना ते राजस्थान मधील दौसा अशा एकूण 229 किलोमीटर लांबीच्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. याच पहिल्या टप्प्याचे आज नरेंद्र मोदी यांच्या करकमलाद्वारे लोकार्पण केले जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या मार्गाचा पहिला टप्पा आज उद्घाटित होणार असला तरी देखील मंगळवारपासून या पहिल्या टप्प्याच्या मार्गावर प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. निश्चितच हा महामार्ग भारताच्या एकात्मिक विकासाला चालना देणार आहे. अशा परिस्थितीत तुम्हालाही या महामार्गाबाबत अधिक माहिती जाणून घ्यायची असेल. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया दिल्ली मुंबई द्रुतगती महामार्गाच्या दहा अशा गोष्टी ज्या तुम्ही आजपर्यंत ऐकल्या किंवा वाचल्या नसतील. यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.