Mumbai Coastal Road Will Open In This Month : मुंबई शहरात आणि उपनगरात पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी, दळणवळण व्यवस्था आणखीनच बळकट करण्यासाठी वेगवेगळी महत्वकांशी रस्ते विकासाची कामे केली जात आहेत. शहरातील ट्रॅफिक ची समस्या दूर करण्यासाठी शासन, प्रशासनाकडून प्रयत्न जोरात सुरू आहेत. दक्षिण मुंबईमधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी देखील प्रयत्न केले जात आहेत.
दक्षिण मुंबईमध्ये वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मुंबई कोस्टल रोड प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की या प्रकल्प अंतर्गत प्रियदर्शनी पार्क ते वरळी सी-लिंक दरम्यान सागरी किनारा मार्ग विकसित केला जात आहे. हा मार्ग जवळपास साडे दहा किलोमीटर लांबीचा आहे. या मार्गाचे काम महापालिकेच्या माध्यमातून केले जात असून हा मार्ग डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण करण्याचे टार्गेट पालिकेने ठेवले होते.
हे पण वाचा :- पुणेकरांसाठी खुशखबर ; ‘या’ बहुचर्चित पुलाचे ‘या’ तारखेला होणार उदघाट्न, पहा डिटेल्स
यानुसार या मार्गाचे युद्ध पातळीवर काम देखील सुरू होते. पण मध्यंतरी या प्रकल्पाच्या कामात थोडासा बदल करण्यात आला. यामुळे आता या प्रकल्पाला थोडा उशीर होणार आहे. यां प्रकल्पाशी संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार वरळीजवळील पुलाच्या कामात बदल करण्यात आला असल्याने आता या मार्गाचे काम 2024 मध्ये होणार आहे.
जून 2024 पर्यंत आता हा मार्ग बांधून तयार होईल आणि वाहतुकीसाठी खुला केला जाईल असे सांगितले जात आहे. दरम्यान या प्रकल्पाचे काम जून 2024 पर्यंत पूर्ण करण्यासाठी प्रकल्पाच्या बांधकाम कामगारांची संख्या वाढवण्यात आली आहे. आतापर्यंत या प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या दुसऱ्या बोगद्याचे काम 90 टक्के पूर्ण झाले आहे.
हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी सोने पे सुहागा ! आता मुंबई आणि नवी मुंबईमधला ‘हा’ भाग मेट्रो मार्गाने जोडला जाणार, पहा कसा असेल रूटमॅप
उर्वरित काम देखील लवकरच पूर्ण करण्याचा मानस पालिकेने बोलून दाखवला आहे. खरं पाहता वरळी जवळील पुलाचे काम वगळता सर्व कामे आधीच्या नियोजित वेळेत म्हणजेच डिसेंबर 2023 पर्यंत होणार आहेत. मात्र विजेचे खांब बसवणे, सीसीटीव्ही केबल टाकणे, सिग्नल रंगरोटी यासह विविध कामांसाठी अतिरिक्त दोन महिन्याचा कालावधी लागणार आहे.
शिवाय वरळी मधील पुलाचे काम करण्यासाठी देखील अधिकचा कालावधी लागणार आहे. एकंदरीत या प्रकल्पाचे काम जून 2024 पर्यंत आता पूर्ण केले जाणार आहे. निश्चितच पुढील वर्षी जून महिन्यात हा मार्ग मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार असल्याने यामुळे मुंबईकरांना वाहतूक कोंडी पासून थोडासा दिलासा मिळणार आहे.
हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी खुशखबर ! लंडन आयच्या धर्तीवर ‘मुंबई आय’ प्रकल्प तयार होणार, उंच पाळण्यात बसून पाहता येणार जीवाची मुंबई, पहा……