Mumbai And Pune Railway News : मुंबई आणि पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे मुंबई आणि पुण्याहून जानेवारी महिन्यात विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे. बारा वर्षांनी उत्तर प्रदेश येथील श्रीक्षेत्र प्रयागराज या ठिकाणी कुंभमेळ्याचे आयोजन होणार आहे.
याच कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने मुंबई आणि पुण्याहून विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की मुंबई ते आणि पुणे ते मऊ या मार्गावर या विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मऊ दरम्यान आणि पुणे ते मऊ दरम्यान जानेवारी महिन्यात विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला असून या निर्णयाचा प्रवाशांच्या माध्यमातून स्वागत करण्यात आले आहे.
कुंभमेळ्याला जाणाऱ्या प्रवाशांसाठी या विशेष ट्रेन चालवल्या जाणार असून आज आपण मुंबई आणि पुण्याहून सोडल्या जाणाऱ्या या विशेष ट्रेनचे संपूर्ण वेळापत्रक थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कस राहणार वेळापत्रक?
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक ०१०३३ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मऊ कुंभमेळा स्पेशल ट्रेन ९, १७, २२, २५ जानेवारी तसेच ५, २२, २६ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सकाळी साडे अकरा वाजता रवाना होईल. ही गाडी खिरकिया, हरदा, बनापुरा, इटारसी मार्गे दुसऱ्या दिवशी रात्री १० वाजता मऊ स्टेशनवर पोहोचेल.
तसेच, गाडी क्रमांक ०१०३४ मऊ- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कुंभमेळा स्पेशल ट्रेन १०, १८, २३, २६ जानेवारी तसेच ६, २३, २७ फेब्रुवारी रोजी मऊ स्टेशनवरून १२.५० वाजता रवाना होईल दुसऱ्या दिवशी १४.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर पोहोचेल.
गाडी क्रमांक ०१४५०पुणे – मऊ कुंभ मेळा स्पेशल दिनांक ८, १६, २४ जानेवारी व ६, ८ व २१ फेब्रुवारी रोजी पुण्यातून सकाळी१० वाजून १० मिनिटांनी प्रस्थान करेल व दुसऱ्या दिवशी रात्री १० वाजता मऊ रेल्वे स्टेशनवर पोहोचेल. परतीच्या प्रवासात ०१४५६ कुंभ मेळा विशेष- ९, १७ २५ जानेवारी तसेच ७ , ९ २२ फेबिरुवारी रोजी मऊ येथून रात्री ११.५० वाजता प्रस्तान करेल व दुसऱ्या दिवशी सायंकाळी ४.४५ वाजता पुण्यात येईल.