Mumbai-Ahmedabad Railway Project : भारतात गेल्या काही वर्षांमध्ये रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुधारण्यावर केंद्र शासनाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. आता देशात रेल्वेची वाहतूक आधीच्या तुलनेत अधिक मजबूत आणि सक्षम झाली आहे. रेल्वे प्रवाशांसाठी रेल्वेने वंदे भारत एक्सप्रेस सारखी हायस्कूल ट्रेन सुरू केली आहे.
विशेष म्हणजे मुंबई ते अहमदाबाद दरम्यान बुलेट ट्रेन चालवण्याचे देखील प्रस्तावित करण्यात आले आहे. याच मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
बुलेट ट्रेन रुळावर केव्हा धावणार आणि या बुलेट ट्रेन प्रकल्पाचा कोणत्या शहरांना फायदा होणार याबाबत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मोठी माहिती दिली आहे.
खरेतर मुंबई ते अहमदाबाद दरम्यान चा बुलेट ट्रेन प्रोजेक्ट हा वर्तमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे भविष्यात मुंबई ते अहमदाबाद दरम्यानची कनेक्टिव्हिटी खूपच सुधारणार आहे.
यामुळे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांना जलद गतीने गुजरातला पोहोचता येणे शक्य होणार आहे आणि गुजरात येथील नागरिकांना जलद गतीने देशाच्या आर्थिक राजधानीला येता येणार आहे. यामुळे देशाची दळणवळण व्यवस्था एका वेगळ्या लेवलला जाईल अशी आशा व्यक्त होत आहे.
पाश्चिमात्य देशात जशी हायटेक दळणवळण व्यवस्था आहे तशीच दळणवळण व्यवस्था आपल्या या 140 कोटी लोकसंख्या असलेल्या देशात सुद्धा या बुलेट ट्रेन प्रोजेक्टमुळे विकसित होणार अशी आशा बोलून दाखवली जात आहे.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत काय म्हणताय रेल्वेमंत्री
रेल्वेमंत्र्यांनी नुकतेच असे सांगितले आहे की, 2 वर्षानंतर देशात बुलेट ट्रेन प्रत्यक्षात दिसणार आहे. आमची तयारी वेगाने सुरू आहे आणि बुलेट ट्रेन 2026 मध्ये सुरू होणार आहे. भारतीय रेल्वेमध्ये होत असलेल्या बदलांकडे लक्ष वेधून रेल्वेमंत्री म्हणाले की, मोदी सरकारचे सर्वात मोठे उद्दिष्ट प्रवाशांची सुरक्षा हे आहे. सुरक्षित प्रवास आणि नंतर सुविधांचा विस्तार हे आमचे पहिले ध्येय आहे.
रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की, बुलेट ट्रेनच्या 284 किलोमीटरच्या ट्रॅकचे काम पूर्ण झाले आहे. हा आकडा 10-12 दिवसांपूर्वीचा आहे, जेव्हा मी पुनरावलोकन केले होते. तसेच रेल्वेमंत्री महोदय यांनी सांगितले की, इतर देशांमध्ये बुलेट ट्रेन प्रकल्प पूर्ण व्हायला 20 वर्षे लागतात, पण भारतात बघा किती जलद गतीने हा प्रकल्प पूर्ण झाला आहे.
यासंदर्भात अधिक माहिती देतांना रेल्वेमंत्री यांनी, ‘बुलेट ट्रेन सुरू झाल्यानंतर ते देशातील सर्वात मजबूत एकल आर्थिक क्षेत्र बनेल. ही ट्रेन मुंबईहून अहमदाबादला जाणार असून मुंबई, ठाणे, वापी, सुरत, वडोदरा, आनंद आणि अहमदाबाद शहरांतील लोकांना या बुलेट ट्रेनने प्रवास करता येणार आहे.
या सर्व शहरांची अर्थव्यवस्था एकाच झोनशी जोडली जाईल,’ अशी आशा व्यक्त केली आहे. या बुलेट ट्रेनमुळे मुंबई ते वडोदरा हा प्रवास फक्त एका तासात पूर्ण होऊ शकणार आहे. या मार्गावर दैनंदिन कामानिमित्त प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे.