Mumbai Ahmedabad Bullet Train : मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन बाबत एक मोठी माहिती हाती आली आहे. खरं पाहता हा प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वकांक्षी प्रोजेक्ट पैकी एक आहे. यामुळे हा प्रोजेक्ट तातडीने पूर्ण करण्यासाठी संबंधित प्राधिकरणाकडून प्रयत्न केले जात आहेत.
त्यासाठी आवश्यक जमीन संपादनाच्या कामाला देखील आता गती लाभली आहे. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन पालघर जिल्ह्यातूनही जाणार आहे या अनुषंगाने जिल्ह्यात आता त्या ठिकाणाहून बुलेट ट्रेन जाणार आहे त्या भागाचे सर्वेक्षण जमीन हस्तांतरण यांसारख्या प्रक्रिया पार पाडल्या जात आहेत.
आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की ही बुलेट ट्रेन पालघर जिल्ह्यातून पालघर वसई डहाणू तलासरी चार तालुक्यातुन जाणार आहे. या बुलेट ट्रेन प्रोजेक्टचा जिल्ह्यात जवळपास 109 किलोमीटर लांबीचा रेल्वे ट्रॅक राहणार आहे.
त्यासाठी एकूण 191.54 हेक्टर जमीन संपादित केली गेली आहे. विशेष म्हणजे संपादित केलेल्या जमिनीचा बहुतांशी मोबदला संबंधितांना देण्यात आला आहे. मात्र अजून 54 हेक्टर जागेचा मोबदला देणे बाकी असल्याचे सांगितले गेले आहे. पालघर आणि वसई या दोन तालुक्यातील 54 हेक्टर जमिनीचा मोबदला हा देण्याचा बाकी आहे.
खरं पाहता, पालघर जिल्ह्यात सुरुवातीला मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचा कडाडून विरोध जमिनधारकांकडून करण्यात येत होता. मात्र प्रशासनाने आणि शासनाने यावर तोडगा काढला असून जमिनीच्या मोबदल्याची रक्कम वाढवली आहे. सुरवातीला चारपट जमिनीला मोबदला दिला जाईल असं ठरलं होतं मात्र शासनाने जमिनधारकांचा रोष लक्षात घेऊन पाचपट मोबदला जमिनीला दिला जाईल असं स्पष्ट केलं. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील हा विरोध काळाच्या ओघात मावळला.
दरम्यान आता या बुलेट ट्रेन प्रोजेक्टसाठी भूसंपादनाच्या कामाला वेग आला असल्याने लवकरच या बुलेट ट्रेन प्रोजेक्ट चे काम सुरु होईल असं चित्र आहे. हा केंद्र शासनाचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प 2027 पर्यंत पूर्ण करण्याचा मानस शासनाने डोळ्यासमोर ठेवला आहे.
निश्चितचं या प्रोजेक्टमुळे राजधानी मुंबई आणि आमदाबाद या दोन शहरांमधील प्रवास सोईचा होणार असून महाराष्ट्र गुजरात कनेक्टिव्हिटी सुधारण्यास मदत होणार आहे. महाराष्ट्रातून गुजरात आणि गुजरात मधून महाराष्ट्रात असा प्रवास जलद गतीने होण्यास यामुळे मदत होईल असा दावा केला जात आहे.