Mulching Paper Subsidy For Farmer : शेतकऱ्यांनी गेल्या काही दशकात शेती व्यवसायात मोठ्या बदल केला आहे. आता शेतकरी बांधव पारंपारिक पद्धतीने शेती करण्याऐवजी आधुनिक पद्धतीने शेती करण्यास अधिक जोर देत आहेत.
शेतकऱ्यांनी आता पारंपारिक पिकांऐवजी नगदी तसेच बागायती, भाजीपाला वर्गीय पिकांची शेती सुरू केली आहे. भाजीपाला पिकांच्या लागवडीमध्ये शेतकऱ्यांनी आता आधुनिक पद्धत स्वीकारले आहे. आता भाजीपाला लागवड ही मल्चिंग पेपर वापरून केली जात आहे.
यामुळे भाजीपालाचे विक्रमी उत्पादन शेतकऱ्यांना मिळवता येणे शक्य बनत आहे. निश्चितच ही शेतकऱ्यांसाठी एक जमेची बाजू आहे. मात्र मल्चिंग पेपर साठी शेतकऱ्यांना अधिकचा खर्च करावा लागतो.यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढतो परिणामी उत्पादनात घट येते.
अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाकडून आता मल्चिंग पेपर साठी देखील अनुदान दिले जात आहे. आता एकात्मिक फलोत्पादन विकास योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्लास्टिक मल्चिंग साठी अनुदान मिळत आहे.
हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; भाताची रोवणी न करता ‘या’ पद्धतीने लागवड केल्यास उत्पादनात होणार भरीव वाढ, पहा डिटेल्स
मल्चिंग पेपरच्या वापरामुळे पीक वाढीसाठी पोषक परिस्थिती बनत आहे. याच्या वापरामुळे पिकांमध्ये तण वाढत नाही तसेच पाण्याचे बाष्पीभवन होत नाही. परिणामी पीक उत्पादनात वाढ होते. यामुळे तणनाशकाची फवारणी करावी लागत नसल्याने खर्चात बचत होते तसेच चांगला दर्जेदार शेतमाल उत्पादित होतो.
याच पार्श्वभूमीवर शासनाच्या माध्यमातून एकात्मिक उत्पादन विकास योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्लास्टिक मल्चिंग पेपरसाठी 50 टक्के अनुदान मिळत आहे. साधारणपणे एक हेक्टर क्षेत्रावर मल्चिंग पेपर टाकण्यासाठी शेतकऱ्यांना 32000 चा खर्च येतो.
यापैकी 50% अनुदान शासन देते म्हणजेच हेक्टरी 16 हजाराचे अनुदान शासनाकडून मिळते. विशेष म्हणजे दोन हेक्टरच्या मर्यादेत हे अनुदान शेतकऱ्यांना मिळते अर्थातच एका शेतकऱ्याला 32 हजारापर्यंतचे मल्चिंग पेपर साठी अनुदान मिळू शकते.
हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! कांदा चाळ बनवण्यासाठी मिळणार 50% अनुदान, अनुदानासाठी अर्ज कुठं करणार, पात्रता काय? वाचा….
कोणत्या शेतकऱ्यांना मिळतो लाभ?
या योजनेअंतर्गत वैयक्तिक शेतकऱ्यांना, शेतकरी समूह, शेतकरी उत्पादक कंपनी, बचत गट, सहकारी संस्था यांना मल्चिंग पेपर साठी अनुदान मिळत आहे. यामुळे निश्चितच या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी मोठी मदत होत आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे करावा लागणार?
इतर अन्य शेतकरी हिताच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर ज्या पद्धतीने अर्ज करावा लागतो तसाच मल्चिंग पेपरसाठी अनुदानाचा लाभ घेणे हेतू शेतकऱ्यांना महाडीबीटीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा लागणार आहे. mahadbtmahait.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन शेतकरी आपला अर्ज सादर करू शकणार आहेत.
कोण कोणती कागदपत्रे लागणार?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना आधार कार्ड, सातबारा उतारा, ८ अ, आधार संलग्न बँक खाते, मोबाईल नंबर, बँक पासबुक, रेशन कार्ड यांसारखी महत्त्वाची कागदपत्रे लागणार आहेत.
हे पण वाचा :- अहमदनगरकरांसाठी महत्त्वाची बातमी; आता नगरमध्ये आणखी एक उड्डाणपुल तयार होणार, ‘या’ ठिकाणी बनवला जाणार नवीन फ्लायओव्हर, पहा….