Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : सध्या महाराष्ट्रात सर्वत्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची चर्चा आहे. या योजनेची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी अर्थसंकल्पात केली होती. यानंतर लगेचच या योजनेचा जीआर निघाला. GR जारी झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांनी या योजनेसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली.
शासनाने जाहीर केलेल्या या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपयांची भेट मिळणार आहे. म्हणजेच वार्षिक 18 हजार रुपयांची भेट मिळणार आहे. या योजनेचा राज्यातील विधवा, विवाहित, घटस्फोटीत, परित्यक्त्या निराधार महिलांना लाभ दिला जाणार आहे.
याचा लाभ हा फक्त महाराष्ट्र राज्यातील रहिवासी महिलांना मिळणार आहे. तसेच ज्या महिला परराज्यातील आहेत मात्र त्यांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषांसोबत लग्न केले आहे अशा महिलांना देखील याचा लाभ मिळणार आहे.
या योजनेअंतर्गत 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांना लाभ दिला जाणार आहे. ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांनाच याचा लाभ मिळणार आहे. मात्र, या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या पंधराशे रुपयांचा लाभ मिळवण्यासाठी महिलांनी अर्ज भरताना विशेष काळजी घेणे आवश्यक राहणार आहे.
अर्ज भरताना साधी एक चूक झाली तरी देखील महिलांना पंधराशे रुपयांपासून वंचित राहावे लागणार आहे. स्वतः उपमुख्यमंत्री तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत या संदर्भात महिलांना सूचना दिल्या आहेत.
अर्ज भरताना ही काळजी घ्या
या योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या महिलांनी जर अर्ज भरताना बँक खाते संदर्भात चुकीची डिटेल दिली तर त्यांना पंधराशे रुपये मिळणार नाहीत. यामुळे अर्ज भरताना महिलांनी त्यांच्या बँक खात्याचा तपशील योग्य पद्धतीने भरणे आवश्यक आहे. अर्ज भरतांना बँक खातेधारकाचे नाव, बँक खाते क्रमांक, IFSC कोड, बँकेचे पूर्ण नाव आणि शाखेचं नाव अशी सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी लागणार आहे.
अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक
सुरुवातीला या योजनेसाठी अर्ज करण्यास 15 जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, अनेकांनी या योजनेसाठी मुदतवाढ दिली गेली पाहिजे अशी मागणी केली. त्यानुसार या योजनेसाठी आता 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे.