Mukhyamantri Majha Ladka Bhau Yojana : सध्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची मोठी चर्चा आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये मिळणार आहेत. दरम्यान याच धर्तीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील तरुणांसाठी मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजनेची घोषणा केली आहे.
या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र तरुणांना वेगवेगळ्या कारखान्यांमध्ये, कंपनीमध्ये सहा महिन्यांसाठी मोफत प्रशिक्षण देण्याचा प्लॅन आहे. तसेच या प्रशिक्षणार्थी तरुणांना सरकारकडून विद्यावेतन देखील दिले जाणार आहे. तरुणांच्या क्वालिफिकेशन नुसार त्यांना 6000 रुपयांपासून ते दहा हजार रुपयांपर्यंतचे विद्यावेतन मिळणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या योजनेअंतर्गत बारावी पासआऊट तरुणांना 6000 रुपयांचे विद्यावेतन मिळणार आहे. डिप्लोमा झालेल्या तरुणांना आठ हजार रुपयांचे विद्यावेतन मिळणार आहे. तसेच पदवीधर तरुणांना प्रत्येक महिन्याला दहा हजार रुपयांचे विद्यावेतन दिले जाणार आहे.
यामुळे माझी लाडकी बहिणी योजनेप्रमाणेच माझा लाडका भाऊ योजनेची देखील महाराष्ट्रात मोठी चर्चा सुरू आहे. मात्र या माझा लाडका भाऊ योजनेसाठी राज्यातील सर्वच तरुण पात्र राहणार नाहीत. याचा लाभ हा काही मोजक्याच तरुणांना होणार आहे.
तसेच याचा लाभ फक्त अशा तरुणांना मिळणार आहे जे कारखान्यात अप्रेंटीशीप करतील. दरम्यान, आज आपण या योजनेचा लाभ कोणत्या तरुणांना मिळणार नाही याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणाला मिळणार नाही लाभ
या योजनेचा लाभ फक्त 18 ते 35 वर्षे वयोगटातील तरुणांना मिळणार आहे. म्हणजे ज्यांचे वय 18 पेक्षा कमी आहे आणि 35 वर्षांपेक्षा जास्त आहे अशा तरुणांना याचा फायदा होणार नाही. या योजनेचा लाभ फक्त बेरोजगार तरुणांना होणार आहे.
जे तरुण शिक्षण घेत आहेत त्यांना याचा लाभ मिळू शकणार नाही. जे तरुण आधीपासूनच सरकारी किंवा खाजगी कंपन्यांमध्ये कामाला आहेत अशा तरुणांना याचा लाभ मिळणार नाही. या योजनेचा लाभ बारावी पास, डिप्लोमा धारक आणि पदवीधारक असणाऱ्या बेरोजगार तरुणांना मिळणार आहे.
अर्थातच जे विद्यार्थी बारावी नापास आहेत किंवा ज्यांचे शिक्षण बारावी पेक्षा कमी झाले आहे अशा तरुणांना या अंतर्गत लाभ मिळणार नाही. याचा लाभ फक्त महाराष्ट्रातील रहिवासी तरुणांना मिळणार आहे.
या योजनेअंतर्गत जे तरुण पात्र ठरतील त्या प्रशिक्षण घेणाऱ्या तरुणांनी जर समजा एका महिन्यात दहा दिवसांपेक्षा जास्त काळ सुट्टी घेतली तर त्यांना विद्यावेतन मिळणार नाही. ज्या तरुणांची प्रशिक्षणासाठी निवड झाली असेल पण ते जर पहिल्याच महिन्यात प्रशिक्षण सोडून गेले तर त्यांना विद्यावेतन मिळणार नाही.
जे उमेदवार आधीपासूनच एखाद्या कंपनीत प्रशिक्षण घेत असतील म्हणजेच अप्रेंटीशीप करत असतील किंवा ज्यांची अप्रेंटिसशिप पूर्ण झालेली असेल असे तरुण यासाठी पात्र राहणार नाहीत. म्हणजे या योजनेचा लाभ फक्त एकदाच घेता येणार आहे.