Mukhyamantri Annapurna Yojana : महाराष्ट्र राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरु केली आहे. विशेष म्हणजे या योजनांची अंमलबजावणी देखील आता सुरू झाली आहे. लाडकी बहिण योजनेसाठी सध्या अर्ज स्वीकारले जात आहेत.
एक जुलैपासून लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज स्वीकारले जात असून 31 ऑगस्ट ही अर्ज भरण्याची शेवटची दिनांक आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळणार आहेत.
जुलै महिन्यापासून या योजनेचे पैसे मिळणार आहेत. 19 ऑगस्टला या योजनेचे जुलै आणि ऑगस्ट अशा दोन्ही महिन्याचे पैसे मिळणार आहेत. अन्नपूर्णा योजना बाबत बोलायचं झालं तर या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना एका वर्षात तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत.
खरंतर, गेल्या काही वर्षांपासून वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता बेजार झाली आहे. वाढत्या महागाईचा सर्वाधिक फटका गृहिणींच्या स्वयंपाक घरातील बजेटला बसत आहे. महागाईमुळे सर्वसामान्यांचे स्वयंपाक घरातील बजेट कोलमडले आहे.
आता मात्र या वाढत्या महागाईपासून सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे. कारण की, महाराष्ट्र राज्य शासनाकडून राज्यातील पात्र महिलांना दरवर्षी तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत.
या योजनेसाठी राज्यातील उज्वला योजनेचे लाभार्थी आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे लाभार्थी पात्र राहणार आहेत. मात्र याचा लाभ एका कुटुंबातील एकाच महिलेला मिळणार आहे.
तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलाच्या नावे गॅस कनेक्शन असणे आवश्यक आहे. दरम्यान, आता याच योजने संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या योजनेअंतर्गत मोफत तीन गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी महिलांना दोन गोष्टींची पूर्तता करावी लागणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी गॅस एजन्सीकडे ई केवायसी करणे गरजेचे असून बँकेशी आधार कार्ड लिंक करावे लागणार आहे.
यामुळे ज्या महिलांनी अजून गॅस एजन्सी कडे जाऊन ई केवायसी केलेली नसेल आणि ज्यांनी बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक केलेले नसेल त्यांनी लवकरात लवकर हे काम करायचे आहे.
ज्या महिला हे काम करणार नाहीत त्यांना पात्र असूनही याचा लाभ मिळणार नाही. यामुळे पात्र महिलांनी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ई केवायसी अन बँक खाते आधार सोबत लिंक करावे असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा विभागाने केले आहे.