Mukhaymantri Majhi Ladki Bahin Yojana : सध्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची मोठी चर्चा सुरू आहे. ही योजना नुकत्याच काही दिवसांपूर्वी सुरू झाली असून यासाठी सध्या मोठ्या प्रमाणावर अर्ज केले जात आहेत. दररोज हजारोंच्या संख्येने या योजनेसाठी अर्ज सादर केले जात आहेत.
यासाठी एक जुलैपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करता येणार आहेत. ही योजना मध्यप्रदेश राज्याच्या लाडली बहना योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळणार आहेत.
म्हणजे पात्र महिलांना एका वर्षात 18 हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे. याचा लाभ राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना मिळणार आहेत. यासाठी 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिला पात्र राहणार आहेत.
याचा लाभ कुटुंबातील एका अविवाहित महिलेला देखील दिला जाणार आहे. वार्षिक अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिला याच्या लाभासाठी पात्र ठरणार आहेत. या योजनेचा लाभ राज्यातील महिलांना मिळणार आहे.
परंतु ज्या महिलांचा जन्म परराज्यात झाला आहे आणि त्यांनी महाराष्ट्रात अधिवास असणाऱ्या पुरुषासोबत लग्न केले आहे अशा महिलांना देखील याचा लाभ दिला जाणार आहे. चार चाकी वाहन (ट्रॅक्टर वगळता) असणाऱ्या कुटुंबातील महिला यासाठी अपात्र ठरणार आहेत.
या योजनेची अंमलबजावणी जुलै महिन्यापासून होणार आहे. म्हणजेच ज्या महिला ऑगस्ट महिन्यात अर्ज करतील त्यांना देखील जुलै महिन्याचे पैसे मिळणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी 19 ऑगस्ट ला अर्थातच रक्षाबंधनाला या योजनेचे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये जमा केले जाणार अशी महत्त्वाची माहिती दिली आहे.
यामुळे सध्या या योजनेसाठी अर्ज करणे हेतू महिलांची मोठी धावपळ पाहायला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दररोज 70 ते 80 हजार महिला या योजनेसाठी अर्ज करत आहेत. दररोज हजारोंच्या संख्येने या योजनेसाठी अर्ज केले जात असल्याने या योजनेची लोकप्रियता किती अधिक आहे हे आपल्या लक्षात येते.
दरम्यान या योजनेसाठी आतापर्यंत राज्यातील एक कोटी 25 लाख 44 हजार 83 महिलांनी अर्ज केला असल्याची माहिती समोर आली आहे. अशा परिस्थितीत या संबंधित अर्जदार महिलांच्या माध्यमातून त्यांनी केलेला अर्ज योजनेसाठी पात्र आहे की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
संबंधित अर्जदार महिलांच्या माध्यमातून आता पात्रता यादीमध्ये आपले नाव कसे तपासायचे असाही प्रश्न उपस्थित होत आहे. तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांना पात्रता यादी त्यांच्या गावातच पाहता येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील प्रत्येक गावात दर शनिवारी लाभार्थी महिलांची यादी वाचली जाणार आहे. म्हणजेच दर शनिवारी महिलांना त्यांचे नाव या योजनेसाठी पात्र आहे की नाही याची माहिती मिळणार आहे. त्यामुळे प्रत्येक शनिवारी या यादीचे वाचन होत असताना संबंधित महिलांनी त्या ठिकाणी हजर राहणे आवश्यक आहे. या यादीचे वाचन समितीच्या मार्फत होणार आहे.