MSRTC Recruitment : दहावी पास तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही बातमी विशेष खास राहणार आहे.
ज्या तरुणांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थातच एसटीमध्ये जॉब करण्याची इच्छा आहे अशा तरुणांना राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या चंद्रपूर आगारात नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे.
या आगारात विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. एकूण 35 पदांसाठी चंद्रपूर आगारात भरती प्रक्रिया राबवली जात असून अर्ज मागविण्यात आले आहेत. दरम्यान आज आपण या पदभरती संदर्भात महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत.
कोणत्या पदांसाठी होणार भरती
चंद्रपूर एसटी आगारामध्ये मेकॅनिक पाच पदे, पेंटर पाच पदे, वेल्डर पाच पदे, मोटार वाहन बॉडी बिल्डर 20 पदे अशी एकूण 35 पदे भरली जाणार आहेत.
अर्ज करण्याची पद्धत
आम्ही आपणास सांगू इच्छितो की या पद भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
या पदभरती अंतर्गत मेकॅनिक पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी https://www.apprenticeshipindia.gov.in/apprenticeship/opportunity-view/63edefc283120a557e5406c7 या लिंक वर क्लिक करा.
या पदभरती अंतर्गत पेंटर या पदासाठी अर्ज करून इच्छिणाऱ्या उमेदवारांनी https://www.apprenticeshipindia.gov.in/apprenticeship/opportunity-view/63edeeca7887170c1f494562 या लिंक वर क्लिक करा.
या पदभरती अंतर्गत वेल्डर या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी https://www.apprenticeshipindia.gov.in/apprenticeship/opportunity-view/63edee487887170b9572aa34 या लिंक वर क्लिक करा.
या पदभरती अंतर्गत मोटार वाहन बॉडी बिल्डर या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी https://www.apprenticeshipindia.gov.in/apprenticeship/opportunity-view/63edbd7581b6d656897f3be2 या लिंक वर क्लिक करा.
पदासाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता
मेकॅनिक डिझेल :- दहावी उत्तीर्ण
पेंटर :- आठवी उत्तीर्ण
वेल्डर :- आठवी उत्तीर्ण
मोटार वाहन बॉडी बिल्डर :- दहावी उत्तीर्ण
पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रतेची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी एकदा जाहिरात पाहणे अनिवार्य राहणार आहे.
वेतन किती मिळणार
मेकॅनिक डिझेल आणि मोटार वाहन बॉडी बिल्डर या पदांसाठी सहा हजार ते आठ हजार 388 दरम्यान वेतनमान राहणार आहे.
तसेच पेंटर आणि वेल्डर या पदांसाठी 5000 ते 9,436 दरम्यान वेतन राहणार आहे.