MSRTC Recruitment : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. संभाजीनगर एसटी आगारात विविध पदांसाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी ही एक मोठी सुवर्णसंधी राहणार आहे. संभाजीनगर एसटी आगारात एकूण 134 रिक्त पदांची भरती होणार आहे.
विशेष बाब म्हणजे यासाठी अधिसूचना प्रसिद्ध झाली असून लवकरात लवकर ऑनलाइन पद्धतीने अर्ज पात्र उमेदवारांना सादर करण्याचे आवाहन यावेळी केले जात आहे. अशा परिस्थितीत आज आपण या पदभरती संदर्भात सर्व आवश्यक माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
हे पण वाचा :- होळीच्या सणाला ‘या’ बँकेने दिली गोड बातमी; गृहकर्जावरील व्याजदरात केली मोठी कपात, आता घर घेणं होणार सोपं
कोणत्या पदांसाठी आहे भरती
मेकॅनिक मोटार वेहिकल या पदाच्या एकूण 45 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. मेकॅनिक मोटर वेहिकल ट्रेडमध्ये ज्या उमेदवारांनी आयटीआय केलेला असेल असे उमेदवार यासाठी पात्र राहतील.
शीट मेंटल वर्कर या पदाच्या देखील 15 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. त्यासाठी देखील संबंधित ट्रेड मधील आयटीआय कम्प्लीट केलेले असणे आवश्यक राहणार आहे.
वीजतंत्री इलेक्ट्रिशन या पदाच्या एकूण 10 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचं इलेक्ट्रिशन ट्रेड मधील आयटीआय कम्प्लीट असणे अनिवार्य आहे.
मेकॅनिकल डिझेल या पदाचा 45 रिक्त पदांची भरती होणार आहे. या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराने संबंधित ट्रेड मधील आयटीआयचे शिक्षण घेतलेले असणे आवश्यक राहणार आहे.
वेल्डर च्या सहा रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. त्यासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराने वेल्डर ट्रेड आयटीआय केलेला असणे आवश्यक असेल.
मेकॅनिक मेकॅट्रॉनिक्स या पदाच्या एकूण 10 रिक्त जागा भरल्या जाणार असून यासाठी संबंधित ट्रेडमधील आयटीआय उत्तीर्ण केलेला असणे आवश्यक राहणार आहे.
इंजिनिअर BE या पदाच्या एकूण तीन जागा भरल्या जाणार आहेत. यंत्र किंवा मोटार अभियांत्रिकी पदवीधर असलेल्या उमेदवारास या पदासाठी अर्ज करता येणार आहे.
अर्ज करण्याची अंतिम दिनांक
वर नमूद केलेल्या पदांसाठी इच्छुक उमेदवारांना 15 मार्च 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहेत. नोकरीचे ठिकाण हे संभाजीनगर एसटी आगार राहणार आहे.
किती राहणार वेतन
वरनमूद केलेल्या वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळे वेतन राहणार असून त्यानुसार 9000 ते 10028 रुपये प्रतिमाह इतक वेतन राहणार आहे.
अधिसूचना कुठं बघणार
अधिसूचना पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी संभाजीनगर एसटी आगार पदभरती 2023 या लिंक वर क्लिक करा.