Mothagaon-Mankoli Khadi Pul : डोंबिवली आणि ठाणेकरांसाठी एक मोठी कामाची बातमी समोर येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मोठा गाव-मानकोली या खाडीपुलाबाबत चर्चा रंगात आहेत. हा पूल प्रवासासाठी नेमका केव्हा सुरू होईल याबाबत वेगवेगळ्या मीडिया रिपोर्टमध्ये वेगवेगळे दावे केले जात आहेत.
वास्तविक हा खाडीपूर डोंबिवली तसेच ठाणेकरांसाठी अति महत्त्वाचा आहे. यामुळे डोंबिवली ते ठाणे हा प्रवास मात्र 20 मिनिटात शक्य होणार आहे. यामुळे प्रवाशांच्या वेळेत तर बचत होईलच शिवाय इंधनात देखील बचत होणार आहे. परिणामी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि प्रदूषण नियंत्रणात ठेवण्यासाठी या पुलाचा मोठा खारीचा वाटा राहणार आहे.
दरम्यान हा पूल नेमका केव्हा सुरू होतो हाच मोठा प्रश्न प्रवाशांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे. अशातच या पुलाच्या बाबतीत एक मोठी माहिती हाती आली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार या पुलाचे जवळपास 85 टक्के काम पूर्ण झाले आहे. अशा परिस्थितीत उर्वरित 15 टक्के काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा मानस मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा आहे.
हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; नेरुळ-उरण रेल्वे मार्ग उद्घाटनाची तारीख हुकली, आता ‘या’ दिवशी सुरु होणार हा मार्ग
मोठागाव-मानकोली खाडी पुलाबाबत थोडक्यात
या पुलाचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थातच एमएमआरडीएच्या माध्यमातून केला जात आहे. शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी या पुलाचे काम प्राधिकरणाच्या माध्यमातून हाती घेण्यात आले आहे. जरी या पुलाचे काम 2017 मध्ये सुरू करण्यात आले असले तरी देखील सुरुवातीच्या टप्प्यात भूसंपादनासाठी मोठी मेहनत प्राधिकरणाला घ्यावी लागली होती.
भूसंपादनासंदर्भात वेगवेगळ्या अडचणी प्राधिकरणाच्या पुढे आल्या होत्या. या अडचणींवर प्राधिकरणाने मात करत जलद गतीने या फुलाचे काम 2020 दरम्यान सुरू केले. मात्र यानंतर कोरोनाचा शिरकाव झाला. कोरोनामुळे या पुलाचे काम मंद पडले. मात्र कोरोना गेला अन जनजीवन सुरळीत झाल्यानंतर या पुलाच्या कामाला गती देण्यात आली.
हे पण वाचा :- शेतकऱ्यांनो सावधान ! एप्रिल महिन्यात ‘इतके’ दिवस अवकाळी पाऊस पडणार; भारतीय हवामान विभागाचा इशारा
आता या पुलाचे 85 टक्के काम पूर्ण झाले असून एप्रिल महिन्यापर्यंत उर्वरित पंधरा टक्के काम पूर्ण होणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, हा पूल कल्याण रिंग रोड आणि ऐरोली काटई रस्त्याला जोडणार आहे. निश्चितच या खाडी पुलामुळे डोंबिवली, ठाणे, भिवंडी, मुंब्रा आणि नवी मुंबई मधील वाहतूक कोंडीची समस्या निस्तारण्यास मोठी मदत होणार आहे.
सध्या ठाणे आणि डोंबिवली दरम्यान प्रवास करण्यासाठी 27 किलोमीटरचा वळसा प्रवाशांना घालावा लागतो. साहजिकच यामुळे या दोन्ही शहरादरम्यान प्रवास करताना प्रवाशांना अधिकचा वेळ आणि इंधन खर्च करावे लागते. मात्र हा पूल कार्यान्वित झाल्यानंतर वीस मिनिटात या दोन्ही शहरा दरम्यान प्रवास होईल आणि यामुळे प्रवाशांना दिलासा मिळेल अशी शक्यता आहे.
हे पण वाचा :- नांदेडच्या शेतकऱ्याचा कौतुकास्पद प्रयोग! लिंबाच्या या जातीची लागवड केली; लाखोंची कमाई झाली, वाचा ही यशोगाथा
केव्हा सुरू होणार हा पूल?
अशा परिस्थितीत या खाडी पुलाची वाट गेल्या काही वर्षांपासून मोठ्या आतुरतेने डोंबिवली कर आणि ठाणेकर पाहत आहेत. या पुलाचे काम लवकरच पूर्ण होईल अशी माहिती आता एमएमआरडीएने दिली आहे. प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, या पुलाचे काम एप्रिल महिन्यात पूर्ण होईल आणि मे महिन्यात म्हणजेच मे 2023 मध्ये हा पूल प्रवाशांसाठी खुला होईल. एकंदरीत मे महिन्यापासून ठाणे ते डोंबिवली चा प्रवास मात्र वीस मिनिटात प्रवासांना करता येणार आहे. यामुळे रोजाना कामानिमित्त जाणाऱ्या चाकरमान्यांना, विद्यार्थ्यांना, व्यावसायिकांना या पुलाचा फायदा होईल असा दावा आहे.
हे पण वाचा :- ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; ‘या’ सागरी मार्गाच्या प्रस्तावाला एमएमआरडीएची परवानगी, ठाण्यातील वाहतूक कोंडी फुटणार, पहा….