Monsoon Update : भारतीय हवामान विभागाने (IMD) एक महत्वपूर्ण माहिती सार्वजनिक केली आहे. भारतीय हवामान विभागाने मान्सूनच्या (Monsoon News) परतण्याबाबत एक महत्त्वाची माहिती दिली आहे. हवामान विभागाच्या मते 5 ते 10 ऑक्टोबर दरम्यान राज्यातून मान्सून (Monsoon) अलविदा घेणार आहे.
राजधानी मुंबईतून मान्सून (Mumbai Monsoon Update) 8 ऑक्टोबरला माघारी फिरणार आहे. मात्र असे असले तरी 26 सप्टेंबर पासून अर्थातच घटस्थापनेच्या दिवसापासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाला (Maharashtra Rain) सुरुवात होणार आहे.
मान्सूनच्या परतीच्या प्रवासात आता उत्तर मान्सून सक्रिय झाला आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की यावर्षी मान्सून सुरुवातीच्या टप्प्यात विश्रांती घेऊन बसला होता. या वर्षी जूनमध्ये पावसाने (Rain Update) पूर्णतः उघडीप दिली होती. मात्र जुलै आणि ऑगस्ट महिन्यात राज्यात सर्वत्र जोरदार स्वरूपाचा पाऊस (Rain) झाला. राज्यातील अनेक जिल्ह्यात या कालावधीत अतिवृष्टी (Heavy Rain) देखील झाली.
यामुळे जुलै आणि ऑगस्ट महिन्यात राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले होते. विदर्भात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असल्याने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे (Farmer) आर्थिक नुकसान झाले होते. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला विशेषता दुसऱ्या आठवड्यात देखील मान्सूनने असाच हाहाकार माजवला. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा फटका बसला आहे.
मात्र जास्तीच्या पावसामुळे (Maharashtra Rain Update) या वर्षी राज्यातील जवळपास सर्वच धरणे हाऊसफुल होण्याच्या मार्गावर आहेत. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील 24 जिल्ह्यात सरासरीपेक्षा 60 टक्के पाऊस झाला आहे. मित्रांनो या वर्षी राज्यातील छोट्या आणि मोठ्या धरणात 85 टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी हाच पाणीसाठा 67 टक्के एवढा होता. अर्थातच या वर्षी चांगला पाऊस मान झाला आहे.
दरम्यान आता मान्सून जाता जाता देखील चांगलाच बसणार आहे. यामुळे राज्यातील प्रमुख धरणाच्या पाणीसाठ्यात अजून वाढ होण्याची शक्यता आहे. निश्चितच या वर्षी शेतकऱ्यांना उन्हाळी हंगामात पावसाची कमतरता भासणार नसल्याचे चित्र आहे. मात्र यावर्षी जास्तीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अशा परिस्थितीत शासनाने शेतकऱ्यांसाठी मदत देखील जाहीर केली आहे. आता शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची रक्कम देखील मिळायला सुरुवात झाली आहे. यामुळे निश्चितच शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे जाणकार नमूद करत आहेत.