Monsoon Update : गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यात पावसाचा (Rain) जोर कमी झाला होता. यामुळे शेतीकामाला पुन्हा एकदा गती मिळाली होती. मात्र आता भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार, पुढील तीन ते चार दिवस राज्यात पावसाचा (Monsoon) जोर वाढणार असल्याची शक्यता आहे.
सध्या विदर्भात संततधार पावसाचे (Monsoon Update 2022) सत्र सुरू असून यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. तसेच पुढील तीन ते चार दिवस कोकणात तसेच पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरात पावसाची शक्यता (Maharashtra Weather) ज्येष्ठ हवामान तज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी व्यक्त केली आहे.
मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग या कोकणातील जिल्ह्यात पुढील चार ते पाच दिवस जोरदार स्वरूपाचा पाऊस कोसळणार आहे. 26 ऑगस्ट पर्यंत राजधानी मुंबईसह या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. हवामान तज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांच्यामते 26 तारखेनंतर देखिल मुंबई आणि कोकणातील काही जिल्ह्यात पावसाची उघडीप होणारं नसल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान गेल्या दोन तीन दिवसांपासून विदर्भात पावसाचा जोर कमी झाला असतानाच पुन्हा एकदा विदर्भात पावसाची शक्यता दाट झाली आहे.
दरम्यान कृष्णानंद होसाळीकर यांच्या मते मध्य महाराष्ट्रातील नाशिक पुणे सातारा कोल्हापूर या जिल्ह्यातील घाटमाथ्यावर जोरदार स्वरूपाचा पाऊस कोसळणार आहे. कृष्णानंद होसाळीकर यांनी दिलेल्या अद्ययावत माहिती नुसार घोटी, इगतपुरी, लोणावळा, मुळशी, ताम्हिणी, महाबळेश्वर, जावळी, बावडा, राधानगरी व परिसरात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता बनली आहे. विदर्भात आणि मराठवाड्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाची उघडीप असले तरीदेखील आगामी आठवडाभर विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
कृष्णानंद होसाळीकर यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात 27 ऑगस्ट नंतर पावसाची उघडीप बघायला मिळणार आहे. मात्र असे असले तरी मुंबई व कोकणातील काही जिल्ह्यांत सत्तावीस तारखे नंतर देखील पावसाची दाट शक्यता आहे. त्यामुळे कोकणवासीयांना सत्तावीस तारखे नंतर देखील काही काळ पाऊस उघडण्याची वाट बघावी लागणार आहे.