Monsoon Update: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोकणात (Konkan) तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात विशेषता घाटमाथ्यावर पावसाचा (Rain) जोर वाढत असल्याचे चित्र आहे. मात्र मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत पावसाचा (Monsoon) जोर चांगलाच कमी आला असून मराठवाडा आणि विदर्भात आता पावसाची (Monsoon News) उघडीप आहे. द
रम्यान, भारतीय हवामान विभागाकडून (IMD) 14 ऑगस्ट म्हणजे आज पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि साताऱ्याचा घाटमाथ्यावर मुसळधार स्वरूपाचा पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज वर्तविला गेला आहे. यामुळे भारतीय हवामान विभागाकडून या संबंधित भागासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाचा जोर ओसरला असला तरी देखील भारतीय हवामान विभागाकडून आज कोकण, किनारपट्टी, विदर्भ तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात (Maharashtra Weather Update) आली आहे.
आज भारतीय हवामान विभागाकडून पुणे आणि सातारा घाट माथ्यावर पावसाची शक्यता वर्तवली गेली असून या भागासाठी ऑरेंज अलर्ट विभागाकडून जारी करण्यात आला आहे. कोकणातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यात याची शक्यता असल्याने विभागाकडून या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील घाटमाथ्यावर देखील पाऊस कोसळणार आहे, यामुळे या भागाला देखील येलो ॲलर्ट जारी करण्यात आला आहे. पूर्व मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.
भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या सुधारित मान्सून अंदाजानुसार, आज पुणे आणि सातारा विशेषता घाटमाथा परिसरात जोरदार स्वरूपाचा पाऊस कोसळणार आहे यामुळे विभागाने या भागाला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यात देखील हवामान विभागाने जोरदार पाऊस पडणार असल्याचा इशारा दिला असून या भागासाठी येलो अलर्ट आज जारी करण्यात आला आहे.
परभणी, हिंगोली, नांदेड, बुलडाणा, अकोला, वर्धा, वाशीम, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यात देखील विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. या भागासाठी भारतीय हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे.