Monsoon Update : संपूर्ण भारत वर्षात गेल्या दोन-तीन दिवसांपासून एकच चर्चा रंगली आहे ती म्हणजे मान्सूनच्या (Monsoon News) परतीच्या प्रवासाबाबत. प्रसारमाध्यमांमध्ये मान्सून (Monsoon) लवकरच परतीचा प्रवास सुरू करणार असल्याच्या चर्चेला मोठं उधाण आले आहे.
यामुळे शेतकरी बांधवांची (Farmer) डोकेदुखी वाढली होती. मात्र आता मान्सूनचा परतीचा प्रवास वेळेवर सुरू होणार असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) सांगितले आहे. यामुळे निश्चितच शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे. भारतीय हवामान विभागाच्या मते या वर्षी मान्सून (Maharashtra Monsoon Update) लवकर परतणार नाही.
याउलट सप्टेंबरमध्ये आणखी जोराचा पाऊस (Maharashtra Rain) पडण्याची शक्यता आहे. सप्टेंबर मध्ये संपूर्ण भारत वर्षात सरासरीपेक्षा अधिक पाऊस कोसळणार असल्याचे आयडीने स्पष्ट केले आहे. आयएमडीचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी गुरुवारी नैऋत्य मान्सून लवकर माघार घेण्याचा गेल्या आठवड्यातील अंदाज फेटाळून लावला आणि या महिन्यात पावसाचा जोर अधिक राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. निश्चितच यामुळे शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव बघायला मिळत आहेत.
ते म्हणाले की, नैऋत्य मान्सून लवकर माघार घेण्याची आम्हाला अपेक्षा असली तरी, पश्चिम-मध्य आणि लगतच्या उत्तर-पश्चिम बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळ 7 सप्टेंबरच्या सुमारास मान्सूनचा प्रवाह दक्षिणेकडे हलवेल. त्यामुळे मध्य आणि उत्तर भारतात पावसाचा जोर वाढेल. त्यामुळे मान्सून लवकर माघारीसाठी परिस्थिती अनुकूल नाही. हवामान विभाग परिस्थितीवर लक्ष ठेवणार आहे.
25 ऑगस्ट रोजी हवामान खात्याने 17 सप्टेंबरच्या सामान्य तारखेपूर्वी नैऋत्य मान्सून लवकर माघार घेण्याचा अंदाज वर्तवला होता. मात्र आता भारतीय हवामान विभागाने आपले पूर्वीचे मत फेटाळून लावले असून हवामानात झालेल्या बदलामुळे आता पावसासाठी पोषक वातावरण तयार होत असल्याचे स्पष्ट केले आहे.
पावसाळ्यात 6 टक्के जास्त पाऊस
विशेष म्हणजे, या वर्षीच्या मान्सूनमध्ये भारतात सहा टक्के जास्त पाऊस झाला आहे, परंतु उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, मणिपूर, त्रिपुरा आणि पश्चिम बंगालच्या मोठ्या भागांमध्ये कमी पाऊस झाला आहे. आपल्या महाराष्ट्राच्या मराठवाड्यातील काही जिल्ह्यात देखील खूपच कमी प्रमाणात पाऊस झाला आहे.
संपूर्ण भारत वर्षात पावसाच्या असामान वितरणामुळे या खरीप हंगामात भात पिकावर परिणाम झाला आहे. दरम्यान, सप्टेंबरमध्ये संपूर्ण भारत वर्षात सरासरीपेक्षा अधिक पाऊस कोसळणार असल्याने पश्चिम आणि दक्षिण उत्तर प्रदेश आणि बिहारच्या काही भागांमध्ये कमी पावसाची भरपाई करण्यात मदत होईल, असे विभागाने म्हटले आहे.
देशातील बहुतांश भागात पावसाची शक्यता आहे
IMD ने म्हटले आहे की, संपूर्ण देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. ईशान्य भारतातील काही भाग आणि वायव्य भारतातील काही भाग वगळता भारताच्या बहुतांश भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे जेथे सामान्यपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. देशातील बहुतांश भागात दिवसाचे तापमान सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, मध्य आणि वायव्य भारताच्या काही भागात कमाल तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.