Monsoon Update : भारतात मान्सून (Monsoon) आता अंतिम टप्प्यात आला आहे. देशातील अनेक भागात आता पावसाची (Rain) हजेरी बघायला मिळतं आहे. हवामान खात्याने (Indian Meteorological Department) दिलेल्या माहितीनुसार राजधानी दिल्लीत पुढील काही दिवस पावसाची शक्यता नाहीय.
मात्र देशातील अनेक भागात पावसाचा जोर कायम राहणार आहे. महाराष्ट्रात देखील पावसाची शक्यता (Rain Alert) भारतीय हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाच्या मते महाराष्ट्रात पुढील चार दिवस पावसाची (Maharashtra Rain) शक्यता कायम राहणार आहे.
मित्रांनो राजधानी मुंबई आणि कोकणातील ठाणे पालघर सिंधुदुर्ग या जिल्ह्यात पावसाने (Monsoon News) चांगलीच हजेरी लावली आहे. याव्यतिरिक्त पश्चिम महाराष्ट्रातील पुणे अहमदनगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यात पावसाची हजेरी बघायला मिळाली आहे.
याशिवाय मराठवाड्यातील लातूर परभणी आणि नांदेड या जिल्ह्यातही पावसाची हजेरी बघायला मिळाली आहे. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असून आगामी चार दिवस पाऊस कोसळणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने (IMD) स्पष्ट केले आहे.
मुंबई, ठाणे, पुण्यासाठी भारतीय हवामान विभागाचा अलर्ट
राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. आगामी 4 दिवस राज्यात पावसाचे सावट राहणार आहे. राजधानी मुंबई ठाणे तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यासाठी आगामी चार दिवस पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागाच्या मते, राज्यातील काही भागात अति मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होणार आहे. पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने महाराष्ट्रात पुन्हा एकदा जनजीवन विस्कळित होणार असल्याचे जाणकार सांगत आहेत.
हवामान खात्याने दिलेल्या अद्ययावत माहिती नुसार, संपूर्ण भारताचा विचार केला तर छत्तीसगड तेलंगाना आणि मध्य महाराष्ट्रात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळणार आहे. तसेच बिहार झारखंड दक्षिण गुजरात आणि लक्षद्वीप या ठिकाणीदेखील पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. या संबंधित राज्यात हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.