Monsoon Update : मित्रांनो जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील पहिल्या दोन आठवड्यात राज्यात पावसाने (Maharashtra Rain) अक्षरशः थैमान माजवल होतं. मात्र ऑगस्ट महिन्यातील दुसऱ्या पंधरवाड्यापासून मान्सूनचा पाऊस (Rain) अक्षरशा गायब झाल्याचे बघायला मिळाले.
राज्यात ऑगस्ट महिन्यातील दुसऱ्या पंधरवड्यापासून पावसाने मोठी विश्रांती घेतली असल्याचे चित्र आहे. यामुळे खरीप हंगामातील पिके पावसाअभावी (Monsoon News) करत असल्याचे दृश्य राज्यात अनेक ठिकाणी बघायला मिळत आहे.
त्यामुळे बळीराजाची पुन्हा एकदा पावसाच्या लहरीपणामुळे दमछाक उडत आहे. दरम्यान 31 ऑगस्ट रोजी म्हणजेच गणरायाच्या आगमनाच्या दिवशी राज्यातील काही भागात पाऊस (Monsoon) झाला मात्र 31 ऑगस्ट रोजी झालेला पाऊस राज्यात सर्वदूर नव्हता. यामुळे अजूनही शेतकरी बांधव पावसाची मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत.
विशेषता मराठवाड्यातील शेतकरी बांधव जाता-जाता का होईना मान्सूनचा चांगला पाऊस होईल ही आशा बांधून आहेत. मित्रांनो, राज्यात ज्या ठिकाणी गेल्या दोन तीन दिवसात पाऊस झाला त्या ठिकाणी शेतकरी बांधव समाधानी असल्याचे दृश्य बघायला मिळत आहे.
मात्र ज्या ठिकाणी ऑगस्ट महिन्यापासून पाऊस नाही त्या ठिकाणी खरीप हंगामातील पिके अक्षरशः जळून खाक होत आहेत. यामध्ये मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांचा समावेश आहे. मात्र असे असले तरी आता भारतीय हवामान विभागाने (IMD) नवीन सुधारित हवामान अंदाज जारी केला आहे.
भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) जारी केलेल्या सुधारित हवामान अंदाजानुसार (Weather Update) सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रात जोरदार पावसाची (rain alert) शक्यता आहे. हाती आलेल्या माहितीनुसार सप्टेंबर महिन्याच्या दुसर्या आणि तिसर्या आठवड्यात महाराष्ट्रात मोठा पाऊस होणार आहे.
शिवाय मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे. हवामान विभागाच्या मते पुढील दोन ते तीन दिवस मराठवाड्यात मोठा पाऊस होण्याची शक्यता आहे. मराठवाडा तसेच विदर्भात देखील पुढील दोन-तीन दिवस जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
एवढेच नाही तर पुढील दोन-तीन दिवस कोकणात देखील हलक्या सरी कोसळलणार आहेत. निश्चितच भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या या सुधारित हवामान अंदाजामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असेल.