Monsoon Update : यावर्षी राज्यात मान्सून हा 10 जूनला दाखल झाला. मानसून (Monsoon) 10 जून ला तळकोकणात दाखल झाला. तळ कोकणात दाखल झाल्यानंतर अवघ्या चोवीस तासात मान्सून (Monsoon News) हा मुंबईमध्ये दाखल झाला.
मात्र वाऱ्याच्या वेगाने मुंबईमध्ये दाखल झालेला मान्सून जसा गायब झाला तसा आता जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यातचं दिसला. आता राज्यात मान्सून सक्रिय झाला असल्याचे सांगितले जात आहे. मान्सूनच्या पावसासाठी (Rain) पोषक वातावरण तयार होत असल्याने मान्सूनच्या सऱ्या (Monsoon Rain) देखील आता राज्यात बरसू लागल्या आहेत.
दरम्यान राज्यातील कोकण किनार पट्टीत मान्सूनचा जोर अजूनच वाढणार असल्याचे सांगितले जात आहे. सध्या राज्यातील शेतकरी बांधव (Farmer) पेरणीच्या कामासाठी लगबग करत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.
काही ठिकाणी अजूनही पेरणीयोग्य पाऊस झाला नसल्याने अशा ठिकाणी शेतकरी बांधव मान्सूनची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र कोकणात गेल्या काही दिवसांपासून मोसमी पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे.
या दरम्यान भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज पासून एक जुलै पर्यंत दक्षिण महाराष्ट्रात तसेच गोव्याच्या किनारी भागात जोरदार पावसाची तसेच वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.
या कालावधीत दक्षिण महाराष्ट्रात तसेच गोव्याच्या किनारी भागात ताशी 60 किलोमीटर वेगाने वारे वाहणार असल्याने भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) नागरिकांना सतर्कतेचा इशारा देखील दिला आहे.
दरम्यान, कोकणातील मासेमारी करणाऱ्या लोकांना समुद्रात न जाण्याचा सल्ला यावेळी देण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आजपासून दोन जुलै पर्यंत पावसाची शक्यता असल्याचे भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. शिवाय मासेमारी करणाऱ्या लोकांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देखील या वेळी देण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागाच्या मते, राजधानी मुंबईत उद्यापासून पावसाचा जोर हवा होणार आहे. मुंबई समवेतच ठाण्यात देखील आगामी दोन दिवस पाऊस बघायला मिळणार आहे. भारतीय हवामान विभागाच्या मते, पुढील तीन ते चार दिवस कोकणात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
दरम्यान राजधानी मुंबई आणि ठाणेला भारतीय हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी देखील दोन दिवस भारतीय हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.