Monsoon Update: हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय राजधानी दिल्लीत आज किमान तापमान 25 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस राहणार आहे.
ओडिशा, मध्य प्रदेश, गुजरातसह अनेक राज्यांतील नद्यांना पूर आला असून पाण्याची पातळी सातत्याने वाढत आहे. आज गुजरात, (Maharashtra Weather Update) महाराष्ट्र, गोवा, उत्तराखंड, राजस्थानसह बहुतांश राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.
गुजरातमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अहमदाबादमध्ये आजचे किमान तापमान 24 अंश सेल्सिअस राहील, तर कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस राहील. या ठिकाणी मुसळधार पावसाची (Monsoon News) शक्यता देखील भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
मध्य प्रदेशची हवामान स्थिती
मध्य प्रदेशबद्दल बोलायचे झाले तर, भोपाळ येथे मेघगर्जनेसह पाऊस सुरूच राहणार आहे. येथे किमान तापमान 23 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस राहील. याशिवाय चंदीगडचे किमान तापमान 26 अंश सेल्सिअस राहील, तर कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस राहील. इथेही पाऊस पडेल. ओडिशा, मध्य प्रदेश, गुजरातसह अनेक राज्यांतील नद्यांना पूर आला असून पाण्याची पातळी सातत्याने वाढत आहे. आज गुजरात, महाराष्ट्र, गोवा, उत्तराखंड, राजस्थानसह बहुतांश राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील या भागात पावसाची शक्यता
भारतीय हवामान विभागाने जारी केलेल्या आपल्या नवीन हवामान अंदाजानुसार, आज राज्यात पावसाची (Monsoon) शक्यता आहे. राज्यात विशेषता विदर्भात विजांच्या कडकडाटासह आज पावसाची (Rain) शक्यता आहे. उर्वरित राज्यात पावसाची (Rain Alert) मात्र उघडीप राहणार आहे. असे असले तरी राज्यातील इतर भागात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस बरसणार आहे. एकंदरीत विदर्भात मुसळधार पाऊस तर उर्वरित महाराष्ट्रात श्रावण सऱ्या बरसणार आहेत.
भारतीय हवामान विभागाच्या मते, आज 18 ऑगस्ट रोजी विदर्भात पावसासाठी पोषक वातावरण असून विदर्भातील अनेक जिल्ह्यात अति मुसळधार पाऊस कोसळणार आहे. विदर्भातील बुलडाणा, अकोला, वर्धा, वाशीम, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. विदर्भातील या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता बघता भारतीय हवामान विभागाने संबंधित जिल्ह्यांना पावसाचा येलो ॲलर्ट आज जारी केला आहे.