Monsoon Update: महाराष्ट्रात गेल्या 15 दिवसांपासून पावसाने (Rain) अनेक ठिकाणी उघडीप दिली होती. पावसाने (Monsoon Rain) उसंत घेतली असल्याने शेतकरी बांधवांना (Farmer) शेतीची कामे करता येत होती मात्र आता पुन्हा एकदा पावसासाठी (Monsoon News) पोषक वातावरण तयार होत आहे. तर काही ठिकाणी दोन-तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. आज देखील राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून (IMD) वर्तवण्यात आली आहे.
यामध्ये कोकणातील (Konkan) पालघर, ठाणे, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, मराठवाड्यातील नांदेड, लातूर, उस्मानाबाद आणि विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ येथे शनिवारी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असून संबंधित जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दुसरीकडे कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर आणि सातारा येथे ऑरेंज अलर्ट भारतीय हवामान विभागाकडून जारी करण्यात आला आहे. तसेच भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अद्ययावत अपडेट अनुसार, 9 ऑगस्टपर्यंत राज्यातील विविध भागात पावसाचा अंदाज आहे. याआधी शुक्रवारीही महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस सुरूच होता. यामुळे ज्या ठिकाणी अतिवृष्टी सारखा पाऊस झाला होता त्या ठिकाणी पिकांची पुन्हा एकदा नासाडी होणार असल्याची शंकादेखील शेतकऱ्यांच्या मनात घर करून आहे.
राजधानी मुंबईचे आजचे हवामान:- आज 6 ऑगस्ट रोजी शनिवारी राजधानी मुंबईत जास्तीत जास्त तापमान 29 आणि कमीत कमी तापमान 25 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. आज राजधानी मुंबईत ढगाळ हवामान आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
पुण्याचे आजचे हवामान:- आज मध्य महाराष्ट्र मधील प्रमुख शहर पुण्यात कमाल तापमान 30 आणि किमान तापमान 22 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून आज वर्तवन्यात आला आहे. आज पुण्यात ढगाळ वातावरण असून मध्यम पावसाची शक्यता आहे.
आज नागपूरचे हवामान:- नागपुरात आज कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. ढगाळ वातावरण असेल आणि एक किंवा दोनदा पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
नाशिकचे आजचे हवामान:- नाशिकमध्ये कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. ढगाळ वातावरण असेल आणि मध्यम पावसाची शक्यता आहे.