Monsoon Update: राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने (Rain) कमालीची विश्रांती घेतली होती. मात्र आता तीन-चार दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा मोसमी पावसाचा (Monsoon News) जोर वाढत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. दरम्यान, मुंबई हवामान केंद्राने आज शुक्रवारी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये पावसाची (Monsoon) काय स्थिती राहील याचा अंदाज नुकताच वर्तवला आहे.
प्रादेशिक हवामान खात्याने (IMD) वर्तवलेल्या ताज्या अंदाजानुसार, राज्याच्या रायगड, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळमध्ये पावसाची शक्यता आहे.
या अनुषंगाने हवामान विभागाने (Mumbai Meteorological Department) संबंधित जिल्ह्यांना यलो अलर्ट देखील जारी केला आहे. तत्पूर्वी गुरुवारीही महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कायम होता. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया आजचा हवामान विभागाचा अंदाज.
राजधानी मुंबईचे आजचे हवामान:- आज शुक्रवारी 5 ऑगस्ट रोजी राजधानी मुंबईत जास्तीत जास्त तापमान 30 आणि कमीत कमी तापमान 25 अंश सेल्सिअस राहण्याचा भारतीय हवामान विभागाचा अंदाज आहे. आज राजधानी मुंबईत ढगाळ वातावरण राहणार असून मध्यम पावसाची शक्यता आहे.
पुण्याचे आजचे हवामान:- पश्चिम महाराष्ट्रातील पुण्यात आज 5 ऑगस्ट रोजी कमाल तापमान 31 आणि किमान तापमान 23 अंश सेल्सिअस राहण्याचा भारतीय हवामान विभागाचा अंदाज आहे. आज मुंबईप्रमाणेच पुण्यातही ढगाळ वातावरण राहणार असून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
आज नागपूरचे हवामान:- विदर्भातील मुख्य शहर नागपुरात आज शुक्रवारी कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस राहण्याचा भारतीय हवामान विभागाचा अंदाज आहे. आज मुंबई आणि पुणे या प्रमाणेच नागपूर मध्ये देखील ढगाळ वातावरण असेल आणि एक किंवा दोनदा पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो.
नाशिकचे आजचे हवामान:- भारतीय हवामान विभागाने वर्तविलेल्या सुधारित हवामान अंदाजानुसार, नाशिकमध्ये आज कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 22 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. आज इतर शहरांप्रमाणेच नाशिक मध्ये देखील ढगाळ वातावरण असेल आणि हलक्या पावसाची शक्यता आहे.
औरंगाबाद:- मराठवाड्यातील प्रमुख शहर औरंगाबादमध्ये आज कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. आज इतर शहरांप्रमाणे औरंगाबाद मध्ये देखील आकाश ढगाळ राहील आणि हलका पाऊस अपेक्षित आहे.